Chandrasekhar Bawankule : पंकजाताईंवर कोठेही अन्याय होत नाही: बावनकुळेंचे स्पष्टीकरण

  • Written By: Published:
Untitled Design (13)

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खुली ऑफर मिळाली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराने पंकजा यांना शिवसेनेत येण्यासाठी साद घातलीय.

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून मिळालेल्या ऑफरवर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडेचे आणि भाजपचे 22 वर्षापासूनचे संबंध आहेत. पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. जाणिवपूर्वक पंकजाताईंच्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पंकजाताई आमच्या नेत्या आहेत. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने बघितले आहे. पंकजाताईंच्या स्वप्नातही येत नाही भाजपला सोडून जाण्याचे. त्या पक्षाच्या सचिव आहेत. मध्य प्रदेशची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोठेही अन्याय होत नाही, असे बावनकुळे म्हणाले.

दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत तीन कंपन्यांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्या तीनही कंपन्या महाराष्ट्रातीलच असल्याचे उघड झाले आहे. यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

या प्रश्नांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, ज्या कंपन्याबरोबर करार केला आहे. त्या संभाजीनगरच्या असल्या किंवा जगातील कोणत्याही देशातील असल्या तरी करार होणे महत्वाचे आहे. झालेले तीनही करार अमलात येणारे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे राज्यात गुंणतवणुक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकवर जाण्यास मदत होईल. दावोसच्या निमित्ताने ही संधी निर्माण झाली आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us