कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही; फडणवीसांचे बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत वेगळे संकेत
CM Devendra Fadanvis On Beed Crime: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण राज्यभरात गाजत आहे. या हत्याप्रकरणात नागरी पुरवठा मंत्री
दुबई की लाहोर… चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल भारत कुठे खेळणार? ICC ने सगळंच सांगितलं
बीड, परभणीच्या घटनेवर कोणी काही बोलत असले तरी महाराष्ट्र हे इतर कोणत्याही राज्यापेक्षा सुरक्षीत राज्य आहे. खरं म्हणजे प्रत्येक घटनेचे राजकारण हे शोभत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. जाती-जातीमध्ये भांडणे लावायची आहे, अशी शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. सरपंच देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, तसेच बीडचे पालकमंत्रिपद हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, बीडचे पालकमंत्रिपद कोणी घ्यायचे यासंदर्भात मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून ठरविणार आहे. पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिलाय.
अजितदादांनी 2009 सालचा वचपा काढला का? विलास लांडेंनी केली भुजबळांच्या नाराजीवर मोठा खुलासा
काँग्रेसवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानाबाबतचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करुन संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलत होते. काँग्रेसने बाबासाहेबांना कसा विरोध केलायं, ते यावेळी सांगत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि आरक्षणाला गांधी-नेहरु कुटुंबाचा विरोध राहिल्याचे पुरावे पंतप्रधान मोदींनी संसदेत समोर आणले, तेव्हा आता काँग्रेसकडून हे नाटक सुरु असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
काँग्रेसने माफी मागायला हवी…
केंद्रीय मंत्री अमित शाहांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करुन काँग्रेसने संसदेचा वेळ खराब केला आहे, आता ते जनतेचा वेळ खराब करीत आहेत. संसदेत बोलताना मोदींनी काँग्रेबाबत विधान केलं, बाबासाहेबांना आणि आरक्षणाला नेहरु-गांधी घराण्याचा कसा विरोध राहिलायं हे पुराव्यासहित मोदींनी जगासमोर आणलं तेव्हा काँग्रेस आता नाटक करण्याच काम करीत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.