Pasha Patel : “अभिमन्यू पवार यांना मंत्रिपदासाठी फडणवीसांचा आशीर्वाद”; निलंगेकरांचा पत्ता कट?

Pasha Patel : “अभिमन्यू पवार यांना मंत्रिपदासाठी फडणवीसांचा आशीर्वाद”; निलंगेकरांचा पत्ता कट?

लातूर : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अभिमन्यू पवार यांच्याशिवाय पक्षश्रेष्ठींसमोर दुसरे नावच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही आमदार पवार यांच्यावर कृपा आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार आणि कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी खळबळ उडवून दिली आहे. पटेल यांच्या या दाव्यानंतर आता माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा पत्ता मंत्रिमंडळ विस्तारातून कट होणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. (Former MLA Pasha Patel has claimed that MLA Abhimanyu Pawar will become a minister)

अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील संघर्षाला आणखी धार :

या विधानाने पाशा पटेल यांनी अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील संघर्षाला आणखी धार दिली असल्याचे बोलले जात आहे. लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यातून विस्तवही जात नाही. अभिमन्यू पवार यांना विधानसभेची उमेदवारी देण्याच्या निर्णयापासून ते कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, कासारशिरशी अप्पर तहसील कार्यालय अशा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर संपूर्ण जिल्हा सातत्याने पाहत असतो. अशात पाशा पटेल यांनी जिल्ह्यातील पुढचा मंत्री म्हणून अभिमन्यू पवार यांचे नाव घेतले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या अभिमन्यू पवार यांना 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी देण्यास भाजपमधीलच काही लोकांचा कडाडून विरोध होता. यात संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर असल्याचे बोलले गेले. मात्र फडणवीस यांची ताकद आणि पवार यांनी बांधलेला मतदारसंघ यामुळे त्यांचा 25 हजार मतांनी दणदणीत विजयी झाले. त्यांच्या या विजयात पाशा पटेल यांचीही भूमिका महत्वाची होती. त्यानंतर नियमीतपणे वेगवेगळ्या कारणांमुळे आमदार पवार आणि आमदार निलंगेकर आमने सामने येत असतात.

‘मी लपून नाहीतर उधळमाथ्याने फिरणारा’; थोरल्या पवारांच्या भेटीवर अजितदादांचं विधान

औसा विधानसभा मतदारसंघाची 65 गावे ही निलंगा तालुक्यात येतात. यातच कासारशिरशी गावाचे नाव येते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अभिमन्यू पवार यांनी कासारशिरसी या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. यानुसार काही दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यातील 63 महसूली गावांसाठी कासारशिरसी येथे स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला निलंगा तालुक्यातून जोरदार विरोध होत आहे.

Sambhaji Bhide : भगव्या राष्ट्रध्वजासाठी संभाजी भिडे आक्रमक; सांगलीत शेकडो कार्यकर्त्यांसह पदयात्रा

याच अप्पर तहसील कार्यालयामुळे सध्या या दोन्ही आमदारांमध्ये धुसफुस सुरू आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समिती स्थापन करून या निर्णयाला जोरदार विरोध केला जात आहे. या कृती समितीला संभाजी पाटील निलंगेकर यांचा आशीर्वाद असल्याच्या चर्चा आहेत. अभिमन्यू पवार हे तालुका तोडण्याचा काम करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच पाशा पटेल यांनी मंत्रिपदाबाबत विधान करुन या दोन्ही आमदारांमधील संघर्षाला आणखी धार आणली असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube