डोक्याला ताप! पंधरा दिवसांपासून सर्दी, खोकला काही सोडेना…

डोक्याला ताप! पंधरा दिवसांपासून सर्दी, खोकला काही सोडेना…

छत्रपती संभाजीनगर : देशात कोरोनानंतर आता एका नव्या प्लूसदृशच्या प्रसारात वाढ झाल्याने अनेक नागरिकांना नव्या प्लूसदृश आजाराच्या लक्षणांचा त्रास जाणवत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना वातावरण बदल आणि नव्या प्लूसदृश आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे.

देशात दोन ते तीन महिन्यांपासून फ्लूसदृश लक्षणे असलेल्या आजाराची साथ आहे. ‘फ्लू ए’चा उपप्रकार ‘एच३एन२’ या विषाणूमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी काही दिवसांपूर्वी हे स्पष्ट केलं.

त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना याच प्लूसदृश आजाराची लक्षणे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये सर्दी, खोकला, ताप अशा लक्षणे आढळून आली आहेत.

शेतकऱ्याचा सरकार विरोधात संताप, दीड एकरवरील कांद्याची केली होळी!

कुटुंबातील एका सदस्याला ही लक्षणे आढळल्यास हीच लक्षणे इतर सदस्यांमध्ये दिसू लागल्याने नव्या प्लूसदृश आजाराची साथ छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही लक्षणे विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

बरं झालं ओळखलं तरी, सनी देओलच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

छत्रपती संभाजीनगरमध्ये असे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने रुग्णांना सर्दी ताप खोकला हा सामान्य फ्लू असून हवामान बदलामुळे ही लक्षणे दिसून येत आहेत. ही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने आजार होतोय.

PM Narendra Modi यांना लिहिलेल्या पत्रात पहिली सही माझी, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

खोकला शिंकेतून होणारा हा आजार आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे असून काही ठिकाणी जाणे टाळणे, हात स्वच्छ धुणे, कोरोना काळात आपण जी काळजी घेत होतो ती पुन्हा घेणे गरजेचे असल्याचं आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube