हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्यातून हातपाय कापण्याची भाषा, जरांगेंनाही दिला इशारा
Babanrao Taiwade : हिंगोलीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात दुसरी ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेला राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा, असे वादग्रस्त वक्तव्य ओबीसी नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी केले आहे.
यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला. यावेळी बोलताना बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली. ओबीसींच्या विरोधात बोलल्यास जरांगे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा दिला.
भुजबळ-मुंडेंनी पक्ष काढला असता तर मुख्यमंत्री होऊन आलो असतो : जानकरांनी सांगितली भुतकाळातील चूक
तायवाडे म्हणाले की मागील तीन महिन्यांपासून राज्यात दोन समाजात संघर्ष सुरु आहे. ओबीसींच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्ही संघर्ष करतोय. मंडल आयोगाच्या अहवालात मराठा समालाला फॉरवर्ड कास्ट म्हटलंय. एकाही आयोगाच्या अहवालात मराठा मागास असल्याचे सांगितले नाही. ओबीसींनी आमचं आरक्षण 70 वर्षांपासून चोरलं असल्याच म्हटलं जातंय. आतापर्यंत सात अहवाल झाले पण एकाही अहवालात मरठा समाज ओबीसी असल्याचे सांगितले नाही. हे आमची लायकी काढत आहेत, आमची लायकी काढणारे हे कोण आहे. आमची लायकी नाही तर मग आमच्या पंक्तीत कशाला येता? असा हल्लाबोल तायवाडे यांनी केला.