राजकारण तापलं! विखेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 51 हजारांचं बक्षीस; मल्हार सेना आक्रमक
Malhar sena Aggressive On Radhakrishna Vikhe : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आरक्षणासाठी शेखर बंगाळे यांनी भंडारा टाकला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शेखर बंगाळे यांना मारहाण केली. त्यामुळे धनगर संघटना आक्रमक झाल्या आहेत. जालन्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध करण्यात आला. त्याचबरोबर आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांचं बक्षीस मल्हार सेनेकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
G20 Summit मधील परदेशी पाहुण्यांसोबतच्या मोदींच्या काही खास क्षणचित्रांवर नजर टाकूया…
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर भंडारा उधळणारे शेखर बंगाळे यांना मारहाण केल्यामुळे धनगर संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. आज जालन्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर मल्हार सेना आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली.
यावेळी राधाकृष्ण विखे यांच्या कार्यकर्त्यांनी धनगर तरुणास लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. त्याचवेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या तोंडाला जो कोणी काळे फासेल त्याला 51 हजार रुपायांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. तसेच राधाकृष्ण विखे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन धनगर समाजाच्या तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मल्हार सेनेकडून तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
घडलं असं की, सोलापूरचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलपूरमध्ये गेले असताना ते लोकांचे निवेदनं स्विकारत होते. त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ते शासकीय विश्रामगृहात असताना तेथे धनगर आरक्षण कृती समितीच्या काही लोकांनी त्यांची भेट घेतली. त्यांना धनगर आरक्षणासाठी निवेदन त्यावेळी तेथे त्यातील एकाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा उधळला. धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक दिवस प्रलंबित असल्याने हा भंडारा उधळून संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी शासकीय विश्रामगृहात घोषणा देखील देण्यात आल्या. या सदस्यांना विखे यांच्या अंगरक्षकांनी आणि पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करत विश्रामगृहाच्या बाहेर काढले. शासनानने धनगर समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही सोलापूरमध्ये पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेलो होतो.
यावेळी आम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावं आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. अशी मागणी केली. तसेच यापुढे आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना काळ देखील फासण्यात येईल असा इशारा यावेळी धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी दिला आहे.