भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट भूमिका; म्हणाले..

भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट भूमिका; म्हणाले..

Mahant Namdev Shastri Extend Support to Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनीही भाष्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. धनंजय मुंडे यांच्यावर फक्त राजकीय सूडापोटी आरोप केले जात आहेत असे नामदेव शास्त्री म्हणाले.

काय म्हणाले महंत नामदेव शास्त्री?

‘धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी माझी चर्चा झाली. सर्व समजून घेतल्यानंतर असं जाणवलं की तो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आणि सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे.’

धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी, नामदेव शास्त्रींकडून काय सल्ला घेणार?

‘मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात आहे. खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत. मुंडेंची पार्श्वभूमी ती नाही. आज मीडियाद्वारे जातीवाद पसरवला जात आहे. मात्र हा विषय किती ताणायचा हा ज्याने त्याने ठरवावं. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे’, असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले.

‘समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही. भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे’, असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भीतीची पद्धत आहे, असं शास्त्री म्हणाले.

परळीची राख वाहतूक प्रदूषणकारी दिसल्यास कारवाई; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

दरम्यान मंत्री धनंजय मुंडे गुरुवारी अहिल्यानगर दौऱ्यावर येणार होते. परंतु ते अहिल्यानगर आले नाहीत. राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडवरही आरोप होत आहेत. तर कराड मंत्री मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. काही सत्ताधारी अन् विरोधक नेत्यांनी धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलंय. तर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर अजित पवार काल बीडमध्ये होते. त्यांनी जिल्हा नियोजनाची बैठक देखील घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube