मराठवाड्यात अजितदादांचे ८ शिलेदार; मंत्रिपदासाठी ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा
Maharashtra Elections 2024 : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर अद्याप मिळालेलं नसलं तरी सरकारचा शपथविधी ठरला आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. तर दुसरीकडे खातेवाटपाच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. कुणाला कोणतं खातं मिळणार याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र वजनदार खात्यांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. अजित पवार गटातील कोणत्या आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.
भाजपची फडणवीसांना हुलकावणी! एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, नवा फॉर्म्युला समोर
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवार गटानेही 41 जागा जिंकत सरस कामगिरी केली. आता एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. काल तर अजित पवार यांनीच भाजपाचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होतील असे सांगून टाकले होते.
यानंतर आता खातेवाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नव्या सरकारमध्ये अजित पवार गटाला 10 ते 12 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत अजित पवार मंत्रिपद देऊ शकतात.
मराठवाड्याच्या राजकारणाच्या दृष्टीने बीड जिल्हा महत्वाचा मानला जात आहे. या जिल्ह्यात धनंजय मुंडे (परळी), विजयसिंह पंडीत (गेवराई), प्रकाश सोळंके (माजलगाव) असे तीन आमदार आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकर, लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात संजय बनसोडे, अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील, परभणी जिल्ह्यातील पाथरीत राजेश विटेकर आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघात राजू ऊर्फ चंद्रकांत नवघरे असे आठ आमदार आहेत. आता या आठपैकी तिघा जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी केव्हा होणार? नार्वेकरांनी थेट तारीखच सांगितली
नांदेड, परभणी, हिंगोलीतून कोण?
निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीत असलेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादीत आले होते. अजित पवार यांनी त्यांना लोहा मतदारसंघातून तिकीट दिले. या मतदारसंघात चिखलीकर आमदार झाले आहेत. आता मंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे. तसेच परभणीतील पाथरीचे राजेश विटेकर आणि हिंगोलीतील राजू नवघरे यांचाही विचार अजित पवार यांच्याकडून होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे.