राज्यात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी केव्हा होणार? नार्वेकरांनी थेट तारीखच सांगितली
Maharashtra CM Oath Ceremony Likely On 5 December : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाले, तरी राज्यात अजून मुख्यमंत्री (Maharashtra CM) निश्चित झालेला नाही, मंत्रिमंडळाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालाय. या निकालामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळालं. त्यानंतर देखील राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नव्हता. यासंदर्भात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, शरद पवारांना काय सांगणार? 2004 मध्ये त्यांना पुर्ण बहूमत असूनही सरकार स्थापन करण्यास किती दिवस लागले होते. दोन चार दिवसांत फार काही फरक पडणार (Maharashtra CM Oath Ceremony) नाही. मात्र , पाच डिसेंबर पर्यंत शपथविधी होवून सरकार स्थापन होईल असा ठाम विश्वास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिर्डीत साई दर्शनानंतर व्यक्त केलाय. सरकार स्थापन होत असताना समविचारी पक्षांना विश्वासात घेवून, चर्चा करून एक मजबूत सरकार स्थापन करणं हे आमचं ध्येय आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. संविधानिक संस्थावर यांचा विश्वास नाही, त्याचप्रमाणे संविधानिक मार्गाने काम होतं यावर देखील यांचा विश्वास नाही, अशी टीका राहुल नार्वेकर यांनी केलीय.
उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर ईव्हीएमविरोधातील बाबा आढावांचे आत्मक्लेश आंदोलन मागे
हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या. मी आमदारकीचा राजनीमा देण्यास तयार असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावर नार्वेकर यांनी हा रडीचा डाव असल्याचं सांगत लोकसभेला सुप्रिया सुळे बारामतीतून विजयी झाल्या, त्यावेळी त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्या. राजीनामा देते, असं का नाही म्हणाल्या नाही असा सवाल उपस्थित केलाय.
स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, पुढील 2 ते 3 दिवस कडाक्याची थंडी, IMD ने दिला इशारा, नाशिकला यलो अलर्ट
भाजप डंक मारणारा विषारी नाग असल्याची टिका संजय राऊतांनी केली होती. यानंतर आता नार्वेकर यांनी देखील संजय राऊतांवर निशाना साधलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील साप कोण आहे? सर्वात जास्त विष कोणी कालवले, हे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना माहीत असल्याचा टोला नार्वेकरांनी संजय राऊंताना लगावलाय. कारणाशिवाय दुसऱ्यांमधील दोष काढायचे ही संजय राऊतांची जुनी सवय आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.