मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; आता साखळी उपोषण करून थोपटणार सरकार विरोधात दंड

  • Written By: Published:
मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; आता साखळी उपोषण करून थोपटणार सरकार विरोधात दंड

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवली सराटी गावात साखळी उपोषण करणार आहेत.

https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0

17 दिवस उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गत तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर ते जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुणी, बदनापूर, धोपटेश्वर या गावांतील मराठा आंदोलनात सहभागी झाले होते.

Revenue Department ची मोठी कारवाई! बदलीनंतरही कामावर हजर न झाल्याने 11 अधिकारी निलंबित 

मराठा समाजासाठी जरांगेंनी अंतरवली सराटी गावात उपोषण केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठ्यांनी 29 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत उपोषण केले. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळं सरकार विरोधात रोष तयार झाला. लाठीचार्ज प्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटलांशी चर्चा सुरू केली होती आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, यासंबंधीच्या जीआरमध्ये त्यांनी वंशावळीची अटक घातली. यानंतर मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.

दरम्यान, सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. मात्र, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, हे जरांगेची मागणी असून त्यावर ते ठाम आहेत. त्यासाठी आता बरे झाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा आरक्षणासाठी साखळी उपोषणाचे हत्यार उपसून सरकार विरोधात दंड थोपाटणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube