‘मोदी साहेब, फडणवीसांना समज द्या, कार्यकर्ते अंगावर घालू नका’; जरांगे पाटलांची मागणी

‘मोदी साहेब, फडणवीसांना समज द्या, कार्यकर्ते अंगावर घालू नका’; जरांगे पाटलांची मागणी

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. तसेच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला. सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही गंभीर आरोप केले. सदावर्ते कुणाचे पिल्लू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या मालकांनी आता हे सांगितलं का? 106 आमदार तुम्हाला यासाठी निवडून दिले होते का? उपमुख्यमंत्र्यांनी असले येडपाट पाळलेत कशाला? मोदी साहेब फडणवीसांना समज द्या, कार्यकर्ते अंगावर घालू नका, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ आणि सदावर्तेंना मराठ्यांना उचकावण्यास सांगितले, असा गंभीर आरोप केला.

पाच हजार पुरावे मिळाले, समितीचं काम बंद करून आरक्षण द्या; जरांगे पाटलांनी ठणकावलं !

फडणवीसांनी सदावर्तेंना समज द्यावी

गुणरत्न सदावर्तेंनी एकदा मराठा समाजाचं वाटोळं केलंय. मराठ्यांच्या विरोधात तेच कोर्टात गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेंना समज द्यावी. सदावर्ते कुणाचे पिल्लू आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. याच मराठा समाजाने तुम्हाला 106 आमदार निवडून दिले आहेत हे विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सरकार येण्यामध्ये मराठा समाजाचा मोठा वाटा आहे.

मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समज द्यावी. ते खालचे कार्यकर्ते अंगावर पाठवत आहेत. मराठा समाजाने तुमच्यासाठीही काही केले आहे. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण द्या तुम्हालाही डोक्यावर घेऊन नाचू. मराठा समाजाला विरोध करण्याचे काम बंद करा आणि तातडीने आरक्षण द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

मनोज जरांगेंचं केवळ शक्तिप्रदर्शन, ठोस निर्णय नाहीच! पुन्हा जुन्याच मागण्यांचा सूर

पाच हजार पुरावे मिळाले आता समितीचे काम बंद करा

दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहू शकणार नाही. पाच हजार पुरावे मिळाले आता समितीचे काम बंद करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केले. दहा दिवसांनंतर जर आरक्षण दिलं नाही तर चाळीसाव्या दिवशी सांगू पुढे काय करायचं ते, पण पुढे मात्र सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही जरांगेंनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube