MLA Sanjay Bansode : लातूरमधून उदगीर जिल्हा कराच…

MLA Sanjay Bansode :  लातूरमधून उदगीर जिल्हा कराच…

लातूर : मराठवाड्यात दोन जिल्ह्यांच्या नामातंरानंतर आता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यासाठी आमदार संजय बनसोडे आक्रमक झाले आहेत. उदगीर तालुक्याला जिल्हा घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी केलीय. स्वंतत्र उदगीर जिल्ह्याचा प्रश्न विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार बनसोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले

आमदार बनसोडे म्हणाले, लातूर जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून उदगीर तालुक्याची ओळख आहे. उदगीरची बाजारपेठ जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. जिल्हाभरातून लोकं खरेदीसाठी येत असतात.

खर्गे हे नावापुरतेच कॉंग्रेसचे अध्यक्ष, रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्याच हाती; पंतप्रधान मोदींची टीका

एका जिल्हानिर्मितीसाठी ज्या गोष्टी हव्या असतात त्या सर्व गोष्टी उदगीरमध्ये आहेत. उदगीर शहरातील रस्ते, इन्फ्रास्ट्रक्टर, प्रशासकीय इमारत, सरकारी कार्यालये, त्यासोबतच सर्वच रस्ते चांगल्या प्रकार तयार करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने लवकरात लवकर उदगीर जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजय बनसोडे यांनी केली.

अहेरांनी उणीवावर बोट ठेवले, आरोग्यमंत्र्यांना आली जाग

अनेक दिवसांपासून उदगीरच्या जनतेने जिल्हा घोषित करण्याची मागणी लाऊन धरलीय. त्यामुळे उदगीर जिल्हा घोषित करुन उदगीरच्या जनतेला न्याय दिला पाहिजे, असंही आमदार बनसोडेंनी स्पष्ट केलंय.

नूकताच राज्य सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरास केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आलीय. त्यानंतर आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असं नामकरण करण्यात आलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube