Sandipan Bhumre: मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे चित्र लावण्याचे सुचलं नाही
औरंगाबाद : गद्दारांच्या हाताने तैलचित्राच्या अनावरून माझ्या आजोबांना दुःख होत असेल असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी देखील खोचक टीका केली आहे.
“माझा पुत्र अडीच वर्ष मुख्यमंत्री होता. असे असताना अडीच वर्षे आपल्या वडिलांचे किंवा आजोबांचे चित्र लावावे हे सुचलं नाही. पण ते काम एका शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं, म्हणून बाळासाहेबांना दुःख होत असेल”अशी खोचक प्रतिक्रिया संदिपान भुमरे यांनी दिली आहे.
तर सध्याचे रक्ताचे वारसदार हे बाळासाहेब होऊ पाहत असून, ते कधीच बाळासाहेब ठाकरे होणार नाहीत अशीही टीका भुमरे यांनी केलीय.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेकडून औरंगाबाद शहरांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पालकमंत्री संदिपान भुमरे व आमदार संजय शिरसाठ यांची उपस्थिती होती.
ही रॅली क्रांती चौकापासून समर्थ नगर, औरंगपुरा, सिडको, कॅनॉट प्लेस चौक, बळीराम पाटील चौक व टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी तीनशेच्या वर वाहनांचा या रॅलीमध्ये समावेश होता.