चव्हाणांच्या विचारांची मला कीव येते, अमित देशमुखांनी घेतलं तोंडसुख…
Amit Deshmukh : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) प्रचंड बहुमत मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यानंतर कॉंग्रेस नेत्यांच्या पराभवावर बोलतांना भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ झाले, अशी टीका केली होती. त्यावर आता आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी भाष्य केलं.
‘आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची आमची भूमिका…’; निवडणुकीतील पराभवानंतर दानवेंचं मोठं वक्तव्य…
विधानसभा निकाल धक्कादायक…
अमित देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावर बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. निकालाबाबत बोलतांना ते म्हणाले की, भाजपच्या विरोधात लाट होती, त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार येईल असं अनेकाना वाटत होतं. मात्र, हाती आलेले निकाल अतिशय धक्कादायक आहेत. अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहे. अनेकांनी ईव्हीएमवर शंका घेतली. माझीही ईव्हीएमवर शंका आहे. पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय, ईव्हीएमवर बोलणं मी टाळेल, असं देशमुख म्हणाले.
अशोक चव्हाण यांच्या टीकेविषयी विचारलं असता देशमुख म्हणाले की, मला अशोक चव्हाण यांच्या विचारांची कीव येते. आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. त्यांचं जर असं म्हणणं असेल की, कॉंग्रेसच्या प्रचाराला कॉंग्रेसच्या नेत्यांनी येऊ नये, तर मग लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे की नाही, हा खरा सवाल आहे, असं देशमुख म्हणाले.
ठाकरे गटाने बैठकीत येणाऱ्या निवडणुका मविआत न लढता स्वतंत्रपणे लढल्या पाहिजेत,असं अंबादास दानवे म्हणाले. त्यावही अमित देशमुख यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मला असं वाटतं की, दानवेंनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केलं, याची मला कल्पनाही नाही. मविआतील सारेच पक्ष या निकालाचा आढावा घेत आहेत. आढावा न घेता त्यावर अशी टीप्पणी करणं योग्य नसल्याचं देशमुख म्हणाले.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
चव्हाण म्हणाले की, लातूरमध्ये एक पडला आणि दुसरा निसटता निसटता कसातरी निघालाय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तर नांदेड आणि भोकरच्या नावाने बोंबलून बोंबलून निघून गेले. ते कसेतरी ते केवळ 150 मतांनी निवडून आले. अन् हे नेते महाराष्ट्राचे नेतृत्व करणार होते. आता त्या काँग्रेसमध्येच राहिलंय काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सगळे साफ झाले. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ झाले… त्यामुळं मला कुणी त्रास देऊ नका, अशी टीका चव्हाण यांनी केली होती.