फडणवीसांच्या कार्यक्रमात पुन्हा मुंडे भगिनींची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चा

फडणवीसांच्या कार्यक्रमात पुन्हा मुंडे भगिनींची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चा

बीड : पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा पार पडला. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच मुंडे कुटुंबियांची अनुपस्थिती पहायला मिळाली.

मागील 15 दिवसांमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा दुसरा बीड जिल्हा दौरा आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या दोघी बहिणींनी पाठ फिरवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा देखील होते आहे.

कार्यक्रमादरम्यान शिवसेनेतून बाहेर पडलेले जयदत्त क्षीरसागर यांची जवळीक देवेंद्र फडणवीसांबरोबर पाहायला मिळाली. या कार्यक्रमानिमित्त मुंडे बहिण भाऊ देखील एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात. मात्र पंकजा मुंडे आणि प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.

त्यामुळे मुंडे कुटुंब नसल्याने गडावर पहिल्यांदाच भक्तांची गर्दी घटल्याचे पाहायला मिळालं. हा कार्यक्रम धार्मिक नसला तरी कार्यक्रमातून राजकीय फटकेबाजी केली.

मराठवाड्यासाठी जलसिंचनावर उपाय म्हणून जयदत्त क्षीरसागरांनी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. तर उपमुख्यमंत्र्यांनी देखील मराठवाड्यासाठी जलसिंचना बरोबरच दिंडी मार्ग बाबत विधान केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube