- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये वन संरक्षक भरतीचा पेपर फुटला, एकाला अटक, 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल
Forest guard recruitment Scam : दोन दिवसांपूर्वी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर वन विभागाच्या वन संरक्षक (Conservator of Forests) पदाची परीक्षा घेण्यात आली. मात्र, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या पेपरफुटी घोटाळ्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला करत एकाला अटक केली आहे. दरम्यान, या नव्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा […]
-
धुळ्यात डिझेलचा ट्रक उलटला, जखमीला मदत करण्याचं सोडून लोकांची डिझेल लुटायला झुंबड
धुळे : धुळे शहरापासून काही अंतरावर डिझेलचा टँकर (Diesel tanker) भर रस्त्यात उलटला. त्यामुळं सर्व डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहून रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. उलटलेल्या डिझेल टँकरमधून सांडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. परिसरातील नागरिकांनी जे काही भांडं मिळेल, त्यात डिझेल भरण्यास सुरुवात केली. (In dhule The […]
-
‘कुणी आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार’, बावनकुळेंकडून नव्या इनकमिंगचे संकेत
Chandrashekhar Bawankule : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राजकीय भूकंप घडवला होता. शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकवले. अजित पवार सध्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. यानंतर काँग्रेसमध्येही अशीच फूट पडण्याच्या […]
-
मुंबई-ठाण्याला झोडपले! आज ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा
Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. आज शुक्रवारी मुंबईसह, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर […]
-
तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार अन् दागिने गायबप्रकरणी विधानपरिषदेत सूचना
धाराशिव : तुळजापूर देवस्थानच्या (Tuljapur temple) लाडू घोटाळ्यातील आरोपींला निलंबित न करता त्याला पुन्हा सेवेत घेतले आणि अनधिकृतपणे महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार दिला. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मंदिरात भ्रष्टाचार वाढला. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या मोजणीत 10 मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब असल्याचे आढळून आले आहे. मंदिराचा शिपाई ते विद्यमान जनसंपर्क अधिकारी असा बेकायदा प्रवास करतांना हेतुपरस्पर केलेल्या भ्रष्ट […]
-
मराठवाड्यात पेट्रोल-डिझेल डेपोची उभारणी होणार, मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांचा आढावा
मुंबईः औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यात यावी. विशेषतः पर्यटन विषयक प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असावेत, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच मराठवाड्यात पेट्रोल-डिझेलच्या डेपोची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. (petrol diesel depot will be constructed in marathwada review […]









