दिवसभरातील दौरे आटपून Pankaja Munde यांनी कार्यकर्त्यांसह मारला पावभाजीवर ताव

दिवसभरातील दौरे आटपून Pankaja Munde यांनी कार्यकर्त्यांसह मारला पावभाजीवर ताव

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पावभाजीचा (pavbhaji) आस्वाद घेतला आहे. पंकजा मुंडे सध्या बीड (Beed) जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर पंकजांनी परळीत राहून अर्थसंकल्प पाहिला, त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. दरम्यान दिवसभरातील आपले दौरे आटपून झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी परळीतील जिजामाता उद्यानासमोरील शिव पावभाजी सेंटरला भेट देऊन आपल्या कार्यकर्त्यांसह पावभाजी खाण्याचा आनंद घेतला आहे.

पंकजा मुंडे भाजपमध्ये होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी मात्र पंकजा मुंडे वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. पंकजा मुंडे ह्या कार्यकर्त्यांसह बीड दौऱ्यावर प्रवास करत असताना थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी म्हणून त्यांनी परळीतील जिजामाता उद्यानासमोरील शिव भाजी सेंटरला भेट देऊन आपल्या कार्यकर्त्यांसह मारला पावभाजीवर ताव मारला आहे.

याअगोदर देखील औरंगाबाद बीड रोडवरून जात असताना त्यांना चहाची तलप लागल्याने रस्त्यात ताफा थांबवून स्वतः एका हॉटेलमध्ये चहा बनवला. विशेष म्हणजे या चहाला त्यांनी PM चहा म्हणजेच पंकजा मुंडेंचा चहा असे नाव देखील दिले. तर यावेळी त्यांनी स्वतः बनवलेली चहा आपल्या सहकाऱ्यांना देखील पाजला. त्यामुळे सद्या पंकजा यांच्या पीएम चहाची देखील मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube