रोहित पवार गोविंदबागेत नसणार! बीडमध्ये जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादी कार्यालयात यंदाचा ‘पाडवा’

रोहित पवार गोविंदबागेत नसणार! बीडमध्ये जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादी कार्यालयात यंदाचा ‘पाडवा’

Sandip Kshirsagar : बीड जिल्ह्यात जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आमदार रोहित पवार(Rohit Pawar) दिवाळी-पाडवा साजरा करणार असल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर(Sandip Kshirsagar ) यांनी दिली आहे. मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यात जाळपोळ केली होती. या जाळपोळामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या घरासह कार्यालयही पेटवून देण्यात आलं होतं. त्यानंतर आता रोहित पवार याच कार्यालयात बीडवासियांसोबत दिवाळी-पाडवा साजरा करणार आहेत.

बीडमधील निष्पाप मराठ्यांवरील कारवाया दोन दिवसांत थांबवा अन्यथा… : जरांगेंचा सरकारला इशारा

आमदार क्षीरसागर म्हणाले, जाळपोळीच्या प्रकारानंतर रोहित पवार भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी यंदाची दिवाळी-पाडवा कुटुंबासहित बीडवासियांसोबत राष्ट्रवादीच्या कार्यालयात साजरा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानूसार ते दिवाळी-पाडवा साजरा करण्यासाठी बीडच्या राष्ट्र्रवादीच्या कार्यालयात येणार असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.

Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज डेट जाहीर

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली.

Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले. राज्यभरात आंदोलने सुरू होती परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला होता. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त होते. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत होते. तसेचही वाहने पेटवून देत होते.

माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या घराला आग लावण्या आली. त्यानंतर बीड शहरातही आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थान व कार्यालयाला आग लावण्यात आली. बीड शहरात बंदोबस्त असतानाही आंदोलकर्त्यांना पोलिसांना चकवत आग लावली. क्षीरसागर यांच्या घराला लावलेला व्हिडिओ हा आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहेत. त्यात आग तीव्र स्वरूपाची दिसत होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube