महिलेकडून वकिलीचा दुरुपयोग! गावकऱ्यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले…

महिलेकडून वकिलीचा दुरुपयोग! गावकऱ्यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले…

Beed News : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांमुळे राज्याच्या केंद्रस्थानी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धग कायम असतानाच एका वकिल महिलेला संरपंचासह 10 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेबद्दल गावकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिलीयं. संबंधित महिला (Beat Women Sarpanch Case) तिच्या वकीलीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आलायं.

मराठी-हिंदी वादावर प्रश्न करताच अजित पवार संतापले; राज ठाकरेंच नाव न घेता लगावला टोला

पीडित महिला वकिली शिकून आल्याने कायद्याचा गैरवापर करीत असून गिरणी बंद करावी म्हणून तक्रारी देत आहे. गावात धार्मिक कार्यक्रम करु देत नाही. गावातील अनेकांवर महिलेने खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. कायद्याचा अभ्यास असल्याने वाट्टेल तसं ती वागत आहे. तिला गावातल्या लोकांनी मारहाण केलेली नाही. त्यांच्या घरातल्या भांडणामुळे तिला मारहाण झाली असेल, पण तिने केलेले सगळे आरोप खोटे आहेत. असं गावकऱ्यांनी म्हटलंय.

साखर कारखान्यांची, बँकांची काय परिस्थिती, माहिती घ्या; जामखेडच्या कार्यक्रमातून अजितदादांनी नगरच्या नेत्यांना घेरले !

नेमकं काय घडलं?
सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेलीय. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडल्याचे ही पुढे आले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आलायं.

घटनेतील पडीत महिलेने ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पिकर, पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. यानंतर या वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध देखील पडली होती. त्यानंतर तिला उपचारानंतर घरी पाठवल्याचे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या मारहाणीनंतरचे फोटो देखील आता समोर आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube