Aditya Thackeray च्या सभेत नेमकं काय घडलं?

Aditya Thackeray च्या सभेत नेमकं काय घडलं?

औरंगाबाद : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसंवाद यात्रेदरम्यान (Shiv Samvad Yatra) काल अनेपक्षित गोंधळ उडाला. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला जबाबदार ठरवत, ‘पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा’ असा इशारा दिलाय. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट पोलिस महासंचालकांना पत्र लिहून, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये कसूर झाल्याचा आरोप केलाय.

वाचा बातमी- Aaditya Thackeray यांच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही.., पोलिसांचा दावा

घटनाक्रम नेमका कसा घडला?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेसाठी औरंगाबादला आले आहेत. या दरम्यान त्यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. सभेदरम्यान गोंधळ होताच आदित्य ठाकरे यांनी जमावाला तातडीने शांत होण्याचं आवाहन केलं.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “बाहेर मला वाटतं भीमशक्तीची मिरवणूक सुरु आहे. त्यांचीदेखील मिरवणूक होऊ द्या, अशी मी विनंती करतो. म्युझिक चालत असेल तर चालूद्या”.

“एक गोष्ट आहे, शिवशक्ती आणि भीमशक्तीत वाद नको. आपण एकत्र आलो आहोत आणि देशासाठी एकत्र आलो आहोत”, असं आदित्य ठाकरे जमावाला उद्देशून म्हणाले. त्यानंतर जमाव शांत झाला.

अंबादास दानवे यांचा आरोप
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केलाय. आदित्य ठाकरेंची सभा सुरु असताना एक दगड आला. सभेवरुन निघताना काही दगड गाडीवर आले, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

काही जण रमेश बोरणारे जिंदाबादच्या घोषणा देत होते, अशीदेखील माहिती अंबादास दानवे यांनी दिली. काही समाजकंटकांनी मुद्दामून गर्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा देखील दावा त्यांनी केला. त्यामुळे या घटनेवर आता पोलीस काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube