Aaditya Thackeray यांच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही.., पोलिसांचा दावा

Aaditya Thackeray यांच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही.., पोलिसांचा दावा

औरंगाबाद : औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महालगावमध्ये काल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला नसल्याचं औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आलंय. घटनास्थळी असं काहीच घडलं नसून किरकोळ वाद झाला आहे, यामध्ये माध्यमाचा एक प्रतिनीधी जखमी झाल्याचा दावा अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे.

काल आदित्य ठाकरे यांचा नाशिकहुन औरंबादकडे नियोजित दौरा होता. सध्या आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सुरु आहे. काल नाशिकमधून औरंगाबादेत यात्रेचं आगमन झालंय. यावेळी महालगावात आदित्य ठाकरेंच्या सभेचा कार्यक्रम होता.

वाचा बातमी : Uddhav Thackeray : निवडणूक आयोगात आमची बाजू मजबूत, शिंदे गटाकडून दिशाभूल

याचवेळी सभेच्या ठिकाणापासून रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक सुरु होती. त्यावेळी सभेतील काही लोकांकडून डीजे बंद करण्यात यावा असं सांगण्यात आले. त्यावरुनच मिरवणूकीतील काही कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी वाद केला.

या वादाचा गोंधळ इतका वाढला की, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र, पोलिसांकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.

दरम्यान, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली असून कालच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असल्यानेच हा प्रकार घडल्याबाबतचे पत्र दानवे यांनी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे कळवलंय.

त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेत आजपासून जास्तीचा पोलिस फौजफाटा राहणार असून शिवसंवाद यात्रा आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात हजेरी लावणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube