छ. संभाजीनगर ड्रग्ज प्रकरण; ‘सरकारला तरुणपिढी बरबाद करायचीयं’; दानवेंनी सरकारलाच जबाबदार धरलं

छ. संभाजीनगर ड्रग्ज प्रकरण; ‘सरकारला तरुणपिढी बरबाद करायचीयं’; दानवेंनी सरकारलाच जबाबदार धरलं

Ambadas Danve Speak on Sambhajinagar Drugs : राज्य सरकारकडून तरुणपिढी बरबाद करण्यात काम सुरु असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांंनी छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज कारवाई प्रकरणी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे.

Sharad Pawar : ‘स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का झाला त्याची चिंता करा’; भाजप नेत्याचा पवारांना टोला

दानवे म्हणाले, गुजरातहून महाराष्ट्रात पोलिस येतात, ड्रग्ज प्रकरणी कारवाई करतात, अन् आपले पोलिस खवा पकडण्यात व्यस्त आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी ड्रग्ज, कोकेनचा राजरोसपणे मोठ्या प्रमाणात होतोयं अन् सरकार झोपलंय , या शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री अन् आता त्याचाही हाफ वन; सुळेंनी फडणवीसांना डिवचलं

गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आलीयं छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

RBI चा राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीला दणका, अडीच कोटी रुपयांचा ठोठावला दंड

रसायनाच्या कारखान्यामध्ये तब्बल 200 कोटी किमतीचे ड्रग्ज तयार करण्यात आले होते, तर 300 कोटी रुपयांचा कच्चा मालही आढळून आला आहे. काही दिवसांत या कच्च्या मालापासून 300 कोटी रुपयांची ड्रग्ज तयार करण्याची तयारी होती. मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई पूर्ण झाली आहे.

Khichdi 2: कीर्ती कुल्हारी अन् जेडी मजेठिया सांगितला ‘खिचडी 2’ सिनेमातील गाण्याचा अनुभव

गुजरात पोलिसांना ड्रग्ज निर्मितीची माहिती मिळाल्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीची खात्री केली. त्यानंतर डीसीपी आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान ही माहिती खरी आढळून आली असून छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्याची खरी लिंक सापडली आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही मोठी कारवाई केली.

दरम्यान, राज्यात गुजरात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात येत असल्याचं पाहायला मिळतयं. या कारवाईवरुन सरकार तरुणपिढी बरबाद करण्याचं काम करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ड्रग्ज कारवाई प्रकरणी विरोधकांकडून टीका केली जात असतानाच आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube