मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; ’13 टक्के आरक्षणाचं उपवर्गीकरण करा’ , फडणवीस म्हणाले…

Matang Community Marches in Mumbai; अनुसूचित जातीच्या आरक्षणात 13 टक्के उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला.

Matang Community Marches in Mumbai Demanding Sub-Classification of 13% SC Reservation

Matang Community Marches in Mumbai Demanding Sub-Classification of 13% SC Reservation: अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणात 13 टक्के उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ काही मोजक्या घटकांपुरता मर्यादित राहत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे आरक्षणाची अ, ब, क, ड अशा उपवर्गांमध्ये विभागणी करून त्याचा लाभ अनुसूचित जातीच्या विविध घटकांना मिळावा, अशी मागणी मातंग समाजाकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकारचा नव्या विमान कंपन्यांसोबत करार; राज्यात विमानसेवेचा विस्तार होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करता येऊ शकते. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपला विरोध कायम राहील, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीवर प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार उपवर्गीकरण करताना अनुसूचित जातींमधील विविध घटकांमध्ये संघर्ष किंवा तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘ज्ञानेश कुमार नव्हे, त्यांच्या बॉसच्या राजीनाम्याची मागणी करा’; अरविंद केजरीवालांचा कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला

अनुसूचित जाती समाजातील ज्या घटकांना सध्या आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नाही, त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा फायदा कसा पोहोचवता येईल, यावर सर्वमान्य भूमिका तयार करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे उपवर्गीकरणाचा निर्णय घेताना सर्व घटकांना विश्वासात घेऊन व्यापक सहमती निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

follow us