दुधापासूनचे ‘पनीर‌’ मेनू कार्ड अन् बिलावर उल्लेख करा नाहीतर…, FSSAI ने दिला रेस्टॉरंट्स – हॉटेल मालकांना इशारा

FSSAI On Paneer Rule  : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरांमध्ये 'पनीर आणि चीज' च्या नावाखाली नॉन-डेअरी व भेसळयुक्त उत्पादने विकली

FSSAI On Paneer Rule

FSSAI On Paneer Rule  : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरांमध्ये ‘पनीर आणि चीज’ च्या नावाखाली नॉन-डेअरी व भेसळयुक्त उत्पादने विकली जात आहे. या भेसळयुक्त पदार्थांमुळे ग्राहकांची फसवणूक होत असून हे भेसळयुक्त पदार्थ आरोग्याला देखील हानीकारक आहे. तर आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने मोठा निर्णय घेतला आहे.

दुधाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकांपासून तयार केलेल्या पदार्थांना आता चीज आणि पनीर म्हणून विक्री करणे नियमाबाह्य असणार असल्याची माहिती एफएसएसएआयकडून (FSSAI) देण्यात आली आहे. एफएसएसएआयने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलातील मेनू कार्डमध्ये आता केवळ पनीरचा उल्लेख चालणार नाही. दुधापासून तयार केलेले पनीर असा स्पष्ट उल्लेख मेनू कार्डवर करावा लागेल असे आदेश एफएसएसएआयने हॉटेल चालकांना दिले आहे.

तर जर एखादा हॉटेलचालक ॲनालॉग पनीर (Paneer) विकत असेल तर तसा देखील उल्लेख मेनू कार्डवर करणे बंधनकारक असल्याची देखील माहिती एफएसएसएआयकडून देण्यात आली आहे. आता कोणतेही पनीर दुधापासूनचे पनीर म्हणून विकता येणार नाही असं देखील एफएसएसएआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्णय का?

पनीर फक्त दुधापासून आणि ॲनालॉग घटकांपासून तयार करण्यात येतो मात्र यातील दुसऱ्या प्रकारात ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याने आता रेस्टॉरंट्स, हॉटेल मालकांना मेनू कार्डवरच नाही तर बिलावरही दुधापासूनचे पनीर किंवा ॲनालॉग पनीर असा स्पष्ट उल्लेख करण्याचे आदेश एफएसएसएआयकडून देण्यात आले आहे.

करार न झाल्यास इराणवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला! शांतता चर्चेपुर्वी ट्रम्प यांची धमकी तर इराणचंही प्रत्युत्तर

तर दुसरीकडे जर रेस्टॉरंट्स आणि हॉटेल मालकांनी मेनू कार्ड आणि बिलावर असा उल्लेख केला नाही तर कारवाई करण्यात येणार असल्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.

follow us