नोकरीची संधी! CRPF मध्ये मेगा भरती; तब्बल 1 लाख 30 हजार कॉन्स्टेबलची पदे भरणार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T113630.924

CRPF Constable Recruitment 2023: दिल्ली : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारी रिक्त जागा भरण्याचे आदेश सरकारने अनेक विभागांना दिले आहेत. त्यानुसार सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या तब्बल 1 लाख 30 हजार जागा भरण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे ठेवण्यात आली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 1 लाख 29 हजार 929 पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी 1 लाख 25 हजार 262 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत, आणि 4 हजार 467 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, 10 टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, माजी लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत समतुल्य आर्मी पात्रता असणे आवश्यक आहे.

WRD Maharashtra Bharti 2023: जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांसाठी मोठी मेगाभरती

उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रोबेश कालावधी हा दोन वर्षांचा आहे. २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० अशी या पदाची वेतनश्रेणी आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत नोटिसमध्ये जाहीर करण्यात आली नाही. मात्र, लवकरच या बाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube