MLA Disqualification Case : ‘त्या’ 16 आमदारांचं काय होणार? आज महत्वाची सुनावणी

MLA Disqualification Case : ‘त्या’ 16 आमदारांचं काय होणार? आज महत्वाची सुनावणी

MLA Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षात आज महत्वाची घडामोड (MLA Disqualification Case ) घडणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. याआधी नार्वेकर यांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. या वेळापत्रकात सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार असे म्हटले होते. परंतु, एक दिवस आधी म्हणजेच आज या प्रकरणात सुनावणी होणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी कालच स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, या सुनावणीनंतर नार्वेकर तडक दिल्ली गाठणार आहेत.

नशिबानं बक्षीस दिलं पण, चौकशीच्या फेऱ्यात अडकलं; ‘त्या’ करोडपती पोलिसाची होणार चौकशी

विधाानसभा अध्यक्षांनी ही सुनावणी एक दिवस आधीच का घेतली याचं उत्तर मिळालं आहे. राजधानी दिल्लीत जी 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी नार्वेकर यांना आजच दिल्लीला जायचं आहे. या कारणामुळेच सुनावणी एक दिवस आधी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहवं लागणार असल्यानेच एक दिवस आधीच अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी होत असल्याचंही नार्वेकरांनी सांगितलं आहे.

Mla Disqualification : सुनावणी एक दिवस आधीच का? राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण…

दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. सुनावणीच्या वेळापत्रकावरुनही विरोधकांनी त्यांना चांगलचं धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरुनही नार्वेकरांनी विरोधकांना चांगलच सुनावलं. ते म्हणाले होते,की ज्या टीका होताहेत, माझ्यावर आरोप केले जाताहेत, त्याच्या पाठीमागचे हेतू मला संपूर्णपणे माहिती आहेत. पण, या टिका-टिप्पणीतून माझ्या निर्णयावर कोणाताही फरक पडणार नसल्याचं ते म्हणाले होते. यानंतर आता आज या प्रकरणात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत दोन्ही गटांकडून काय युक्तिवाद केले जातात. या प्रकरणात आज निर्णय घेतला जाणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube