अजित पवारांच्या बंडानंतर आमदार लंकेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, दोन दिवसांत…
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यांनी रविवारी आमदारांचा मोठा गट बाजूला घेत शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील आहे. आता या बंडानंतर लंके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. येत्या दोन दिवसात सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल असे सूचक ट्विट आमदार लंके यांनी केले आहे.
राजकारणात येऊन चूक केलीय.., अजितदादांच्या बंडावर रोहित पवार भावनिक
काय म्हणाले लंके?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत. या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो.
ही ‘गुगली’ नाहीतर दरोडाच, अजित पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचा घणाघात
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या खदखदीचा परिणाम अखेर राज्याच्या राजकारणात दिसून आला आहे. अखेर राष्ट्रवादीचा राजीनामा देत अजित पवार आपल्या 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार सामील झाले आहेत. एवढंच नाही तर अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
हिंगोलीसाठी ठाकरेंची रणनीती ठरली? काँग्रेसचा दावा खोडून काढण्यासाठी स्थानिक उमेदवाराचे नाव चर्चेत
अजित पवार यांच्या आमदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदारांनी देखील हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने संग्राम जगताप, किरण लहामटे व निलेश लंके हे राजभवनात होते. लंके हे शरद पवार यांचा शब्द मानणारे अशी त्यांची ओळख होती. शरद पवार यांच्या कार्याचा आपल्यावर प्रभाव आहे असे अनेकदा लंके यांनी म्हंटले देखील आहे.
https://www.youtube.com/watch?v=OJ4T-D95mY4
कोविड काळात कोरोना सेंटरला शरद पवार यांचे नाव लंके यांनी दिले होते. राजकारणातील गुरु म्हणून लंके शरद पवार यांच्याकडे पाहत असत. मात्र रविवारी लंके हे अजित पवारांच्या शपथविधीला पोहचले. मात्र आज त्यांनी ट्विटद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे.