…तर तुम्ही सांगाल तिथं येतो, आमदार जगतापांचं राणेंना ओपन चॅलेंज

…तर तुम्ही सांगाल तिथं येतो, आमदार जगतापांचं राणेंना ओपन चॅलेंज

नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही तिथं येतो, असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना दिलंय. दरम्यान, अहमदनगरमध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.

Parineeti Chopra: परिणीती आणि राघव चड्ढाचा झाला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी छोटेखानी सभा घेत आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यावर आमदार जगतापांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदार संग्राम जगताप म्हणाले, नितेश राणेंची उंची कमी असल्याने त्यांना मी दिसत नाही. नितेश राणेंची उंची माझ्या शर्टच्या बटनाएवढी आहे.

Gulabrao Patil On Udhav Thackery : मला मंत्री करताना तीन-चारदा तपासलं, स्वतः थेट मुख्यमंत्री झाले

राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राणे कुटुंबियांबद्दलची स्वाभिमान विलीन केलेल्यांबद्दलची माहिती विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात दिली. राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी महाराष्ट्राला माहित असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

आमदार राणे काय म्हणाले :
राणे यांनी बोलताना आमदार जगताप यांना इशारा दिला. राणे म्हणाले, इथला आमदार माझ्या नजरेला उभा थांबत नाही. माझ्या नादाला कोणी लागू नये, 2024 ला अहमदनगरमध्ये येऊन मी हिसका दाखवणार असल्याचं आमदार राणे यांनी आमदार संग्राम जगताप यांना इशारा दिला होता.

नगरमध्ये व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी आम्ही ताबडतोब पीडिताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून आरोपींवर तत्काळ कारवाईची भूमिका प्रशासनासमोर मांडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अशा घटना याआधीही वारंवार घडत होत्या. मध्यांतरी हे सर्व थांबलं होतं, मात्र, काही लोकांकडून अशा गोष्टी घडत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Horoscope Today, April 18, 2023: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

दरम्यान, अहमदनगरमध्ये येऊन कोणी अशी भाषा वापरु नये अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाणार असल्याचा सज्जड इशारा आमदार जगातापांनी यावेळी दिला आहे. अहमदनगरच्या बाजारपेठेत दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एक व्यापारी गंभीर जखमी झाला.

या घटनेचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादात जखमी झालेल्या व्यापाऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली आहे. त्यानंतर त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हा प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube