ग्रेट अ‍ॅक्टर अ्न पेड नेत्यावरील हल्ल्याने मला दु:ख;, शिरसाटांचा अंधारेंना सणसणीत टोला…

ग्रेट अ‍ॅक्टर अ्न पेड नेत्यावरील हल्ल्याने मला दु:ख;, शिरसाटांचा अंधारेंना सणसणीत टोला…

MLA Sanjay Shirsath On Sushma Andhare : ग्रेट अॅक्टर अन् पेड नेत्यावरील हल्ला झाल्याचं ऐकून मला दुख: झालं असल्याचा सणसणीत टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंना लगावला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यात वाद झाला. त्यानंतर जाधव यांची ठाकरे गटातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आलीय. त्यावरुन आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना पुणेरी टोमणा; म्हणाल्या, अशाने दरवेळेस कोणी…

आमदार शिरसाट म्हणाले, ज्या सुषमा अंधारे बाळासाहेबांना म्हातारड्या म्हणाल्या होत्या, उद्धव ठाकरेंची वाट लावली, आदित्यला लुंगी डान्स कर, असं बोलल्या त्यांना उद्धव ठाकरे यांनी मान्य केलंय आहे, अन् तुमच्या निष्ठेला काय चाटतो काय? तुमच्या निष्ठेला कोण विचारतंय, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी आप्पासाहेब जाधव यांच्यावरही निशाणा साधला आहे.

गौतमी पाटील कॉन्ट्रॉव्हर्सी क्वीन; पुण्यातील कार्यक्रमानंतर काय होतोय आरोप?

बाळासाहेब ठाकरेंनी निष्ठेला महत्व दिलं होतं. बर झालं अजून आप्पासाहेब जाधवला गद्दार म्हटलेलं नाही. ज्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं, त्यांना उद्धव ठाकरेंनी एका क्षणात राजकारणातून बाहेर काढलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी कोणीही महिलेवर हात उचलू नये, पण महिलेनेही आपली मर्यादा ओलांडू नये, असा इशारा सुषमा अंधारे यांना दिला आहे.

एक फोन, 1070 कोटींची खबर अन् पोलिसांचीही तंतरली… भर रस्त्यात काय घडलं?

संजय शिरसाट यांनी ठाकरे गटात घडत असलेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य करीत उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आतात तरी डोळे उघडून या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे, नाहीतर संजय राऊत आणि सुषमा अंधारेंची जोडी ठाकरेंना डुबवल्याशिवाय राहणार नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

तसेच सुषमा अंधारेसारख्या ग्रेट अॅक्टर, पेड नेत्याला मारहाण झाल्याचं ऐकून मला आश्चर्य वाटलं, तसंच दुख:ही झालं आहे. जेव्हा एखाद्या महिलेवर हात उचलण्याइतकी मजल जाते तेव्हा लिमिट संपली असल्याचा अर्थ निघतो, सुषमा अंधारे काहीतरी बोलल्या असाव्यात म्हणून आप्पासाहेब जाधवांनी हात उचलला असावा, असं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube