संजय शिरसाटांना मंत्री करा! ठाकरे गटाच्या आमदाराची खुली तर आव्हाडांची छुपी शिफारस?

संजय शिरसाटांना मंत्री करा! ठाकरे गटाच्या आमदाराची खुली तर आव्हाडांची छुपी शिफारस?

मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्री करा, अशी शिफारस खुद्द शिवसेना (UBT) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. एका एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्याकडे ही मागणी केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट या तिघांचा एकत्रित व्हिडीओ व्हायरल होतं आहे. यातही आव्हाड शिंदेंना काही तरी सांगत आहेत, तर शिंदे आणि शिरसाट त्या गोष्टीला दुजोरा देत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आव्हाडांनीही शिंदेंकडे तीच मागणी केली का असा सवाल विचारला जात आहे. (MLA Vaibhav Naik and Jitendra Awad’s recommendation to Chief Minister Eknath Shinde for Sanjay Shirsat’s ministerial post)

मुंबई तक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय शिरसाट आणि वैभव नाईक बोलत होते. यावेळी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. तर आमची मैत्री एका ठिकाणी आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. माझी विचारधारा, माझी भूमिका, त्यांची विचारधारा, त्यांची भूमिका या गोष्टी राजकारणात, पण वैभव नाईक माझे मित्र आहेत, आणि राहतील असे शिरसाट म्हणाले. तर त्याचवेळी नाईक यांनी शिरसाट यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी मागणी केली. खरंतर पहिल्या फेरीतच त्यांना संधी मिळायला हवी होती. पण पहिल्या फेरीत काही झालं नाही. आता तरी निश्चित त्यांनी पुनर्विचार करावा असं आमदार नाईक म्हणाले.

शिरसाट यांच्यासाठी आव्हाडांचीही शिफारस?

नाईक आणि शिरसाट यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतं असतानाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट या तिघांचा एकत्रित व्हिडीओ व्हायरल होतं आहे. यातही आव्हाड शिंदेंना काही तरी सांगत आहेत, तर शिंदे आणि शिरसाट त्या गोष्टीला दुजोरा देत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आव्हाडांनीही शिंदेंकडे तीच मागणी केली का असा सवाल विचारला जात आहे.

आव्हाडांनी संधी साधली; CM शिंदेंना भेटत ठाण्यातील विरोधकांना दिला संदेश?

काल इर्शाळवाडीचा दौरा आटोपून मुख्यमंत्री शिंदे पावसाळी अधिवेशनात येत होते. मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांचे चित्रिकरण करण्यासाठी अनेक माध्यमांचे कॅमेरे स्टँड बाय होते. याचवेळी विधानमंडळ इमारती मधून बाहेर पडत असलेले जितेंद्र आव्हाड हे पेंडोल जवळ थांबले. मुख्यमंत्री हे जवळ येताच आव्हाडांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांच्या कानात काही तरी सांगू लागले. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आमदार संजय शिरसाट होते. शिरासाट तुम्हाला मंत्रिपद कधी असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत होते. हाच विषय कदाचित जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थित केला असावा, असं सांगितलं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube