आमदार, खासदारांची अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भेट

आमदार, खासदारांची अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भेट

अहमदनगर : जिल्ह्यातील कोविड उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच कोविड उपाय योजनांची पाहणी केली.

केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने १९ कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेसाठी दिले होते.

शंभर बेडचे आय.सी.यू सेंटर तयार असून यामधील ४० बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नगरचे आय.सी.यू सेन्टर तयार झाले आहे. कोविडची लाट येणार नाही परंतु ती दुर्दैवाने आली तर आपण सर्वजण सज्ज आहोत, असे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक अजय चितळे, तायगा शिंदे, सतीश शिंदे, महादेव कराळे आदींसह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube