शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषी मंत्र्या विरोधात, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

  • Written By: Published:
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषी मंत्र्या विरोधात, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… 500 कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा नववा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदेसरकारच्या विरोधात आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कांद्याला क्विंटलमागे 300 रुपये अनुदान, राज्य सरकारची घोषणा… 

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसापूर्वी अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य केलं होत. अब्दुल सत्तार म्हणाले होते की राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय काय नवीन नाही. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमठले होते. राज्यातील शेतकऱ्यांसह अनेक शेतकरी संघटनांनी या वक्तव्याचा विरोध केला. होता. त्यांच्या या वक्त्यव्याचे पडसाद आज सभागृहात पाहायला मिळाले. विरोधकांनी सत्तारांच्या विरोधात घोषणा दिल्या.

सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे सरकार सत्तारांची पाठराखण करून शेतकऱ्यांचा अपमान करत आहे असे मिटकरी म्हणाले. जर हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असेल तर त्यांनी ताबतोप सत्तारांची कृषिमंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी मिटकरींनी केली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube