विधासनभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव!

विधासनभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव!

नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आहे. दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यात आला आहे.

नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस चांगलाच गाजलाय. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला.

अविश्वास ठरावाबाबतचं ३९ आमदारांचं पत्र महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आलं असून आरोप-प्रत्यारोपांनंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव आणल्याने शेवटचा दिवस महत्वाचा ठरलाय.

दरम्यान, सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपूडकर, अनिल पाटील यांच्याकडून विधानसभा सचिवांना ३९ आमदारांच्या सह्यांचं पत्र देण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष नियमाबाह्य पद्धतीनं कामकाज चालवत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आलीय आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube