मोठी बातमी! राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा…

मोठी बातमी! राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा…

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परिक्षेची (MPSC Exam) तारीख घोषित झालीयं. राज्यसेवा पूर्व परिक्षा येत्या 6 जुलै होणार असून या परिक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्येही वाढ करण्यात आलीयं. या जागांमध्ये वाढ केल्यानंतर आता 524 पदांसाठी राज्यसेवेची परिक्षा होणार आहे. यासोबतच एसईबीसी उमेवारांसाठी फार्म भरण्यासाठीही सुविधा देण्यात आलीयं. या आधी 274 पदांसाठी परिक्षा घेण्यात येणार होती, त्यामध्ये आता 250 जागा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यसेवेची परिक्षा 524 पदांसाठी घेण्यात येणार आहे.

सुधारित जाहीरातीनूसार एकूण 524 पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून उपजिल्हाधिकारी पदासाठी एकूण 7 पदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त पदासाठी एकूण 116 पदे, गटविकास अधिकारी पदासाठी 52 पदे, सहाय्यक संचालक वित्त व लेखा सेवा 43 पदे, सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी आदिवासी 3 पदे, उद्योग उपसंचालक 7 पदे, सहाय्यक कामगार आयुक्त 2 पदे, सहाय्यक कौशल्या विकास रोजगार उद्योजकता 1 पद, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी 19 पदे, सहाय्यक गटविकास अधिकारी 25 पदे, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, 1 पद, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 5 पदे, कौशल्या विकास रोजगार उद्योजकता अधिकारी 7 पदे, सरकारी कामगार अधिकारी, 4 पदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी साख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/संशोधन अधिकारी/गृहप्रमुख 4 पदे,उद्योग अधिकारी 7 पदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी 52 पदे, निरीक्षण अधिकारी 76 पदे,महसूल व वन विभाग 48 पदे, वनक्षेत्रपाल 16 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण 45 पदे त्यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य 23 पदे, जलसंधारण अधिकारी 22 पदे, या जागांमध्ये वाढ करण्यात आली असून एकूण 524 पदांसाठी परीक्षा होणार आहे.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 9 मे 2024 पासून सुरुवात होणार असून 24 मे 2024 रोजी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 27 मे 2024 असणार आहे. त्याआधीच उमेदवारांना अर्ज आणि परीक्षा शुल्क भरावे लागणार आहेत. याआधी 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 274 पदासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी पूर्वनियोजित होती. मात्र, एसईबीसी उमेदवारांसाठी तरतूद करण्यात आल्याने सुधारित जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता सुधारित जाहीरातीनूसार येत्या 6 जुलै रोजी परीक्षा होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube