कंत्राटी पोलीस भरतीवर फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, कधीही…

कंत्राटी पोलीस भरतीवर फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, कधीही…

DCM Devendra Fadanvis :  राज्यामध्ये पोलिसांची कंत्राटी भरती करण्यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावरुन सरकारा धारेवर धरले होते. यावर आता उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदन दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांची कंत्राटी भरती होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7,076 पोलीस शिपाई पदे नियमित भरतीद्वारे भरण्याची कार्यवाही करण्यात येत असून भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी पोलीस शिपाई उपलब्ध होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

अजितदादांनी सरड्यासारखेच रंग बदलले, नाना पटोले यांची जळजळीत टीका…

या सर्व कारणांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाने 3000 मनुष्यबळ तुर्तास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. 3000 मनुष्यबळ प्रत्यक्ष पतभरतीचा कालावधी किंवा 11 महिने यापैकी जो कमी असेल त्याच कालावधीसाठी उपलब्ध करुन घेण्यास मान्यता आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाकरिता देण्यात आलेले बाह्ययंत्रणेवरील 3000 मनुष्यबळ हे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील असून मुंबई पोलीस आयुक्तालयातील नियमित पोलीस शिपाई पदे कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर या बाह्ययंत्रणेवरील मनुष्यबळाचा सेवा संपुष्टात येतील. या 3000 कर्मचाऱ्यांकडून केवळ सुरक्षा विषयक कामकाज व गार्ड विषयक कर्तव्य, स्टॅटिक ड्युटी करुन घेण्यात येणार असून कायदे विषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नाही.

सोमय्यांचा पाय खोलात! तो व्हायरल व्हिडिओ खरा, गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती

दरम्यान, फडणवीस यांच्या या निवदेनामुळे पोलिसांची कोणतीही कंत्राट भरती होणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. या निवदेनामुळे पोलिसांच्या कंत्राटी भरतीच्या विषयाला पूर्ण विराम मिळाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube