नाही तर विकेट टाकायची अन् मॅचचा आनंद घ्यायचा…; जागा वाटपावर ठणकावतांना ठाकरेंचं मिश्किल विधानं

  • Written By: Published:
नाही तर विकेट टाकायची अन् मॅचचा आनंद घ्यायचा…; जागा वाटपावर ठणकावतांना ठाकरेंचं मिश्किल विधानं

मुंबई : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मविआने कंबर कसली असून, महाविकास आघाडीने मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात पहिला मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातील पहिल्या भाषणाचा मान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देण्यात आला. यावेळी ठाकरेंनी विधानसभेच्या जागावाटपापासून  ते मोदी सरकारपर्यंतच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची (MVA) पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केल्याचे सांगतले. (Uddhav Thackeray Speech In MVA Melava)

मोठी बातमी : नारायण राणेंची खासदारकी जाणार?; मुंबई हायकोर्टाकडून राणेंना समन्स

…नाही तर विकेट फेकायची अ्न मॅच एन्जॉय करायची

उपस्थितांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं. ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता, असे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

जागावाटपवरून भांडण करू नका; ठाकरेंनी ठणकावलं

यावेळी ठाकरेंनी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही असे सांगितले. तसेच लोकसभेत सांगलीच्या जागेवरून झालेल्या गदारोळानंतर आज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि सर्वांना जागावाटपवरून भांडण करू नका, कामात वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. असे सांगत ज्या पक्षाला जी जागा सुटले त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करा असे सांगितले.

भारताचं स्वातंत्र्य बांगलादेशामुळे अधोरेखीत होत असेल तर…सरन्यायाधिशांच्या वक्तव्यावर ठाकरे का संतापले?

विरोधकांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. काँग्रेसचा हात, सेनेची मशाल, आणि पवार साहेबांचा हातात तुतारी असलेला मावळा गावागावात पोहोचवा असे ठाकरे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा पण जागा वाटपात भांडण करू नये, अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

ठाकरेंचा पटोलेंना चिमटा

लढाई अशी लढायची की, एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील. लोकसभेत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजलं. आता विधानसभेची लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या भाषणावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नव्हते. त्यामुळे ठाकरेंनी मघाशी नाना, तुम्ही नव्हतात. मी बोललो की, मुख्यमंत्री कोण होणार? आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. मी त्याला पाठींबा सगळ्यांच्यासमोर द्यायला तयार आहे, असं म्हणत ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडत पटोलेंना चिमटा काढला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube