Nitin Gadakari : नांदेड-पुणे अंतर साडेतीन तासात कापता येणार, गडकरींनी सांगितला प्लॅन

Nitin Gadkari

नांदेड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदेडमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर विविध विकासकामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी नांदेड-पुणे अंतर साडेतीन तासात कापता येणार असल्याची महत्त्वाची माहिती गडकरी यांनी दिली.

Devendra Fadanvis पुण्यातून लोकसभा लढविणार? त्यांनीच दिले उत्तर

नांदेड-पुणे अंतर साडेतीन तासात कसं कापता येणार ? हे सांगताना नितीन गडकरी म्हणाले, ‘समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना, नांदेड, परभणी जालना यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले की, नांदेड-पुणे अंतर अवघ्या साडेतीन तासात पुर्ण होईल.’ त्याचबरोबर त्यांनी नांदेड-रत्नागिरी महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नांदेडसह 11 जिल्हे या महामार्गाला जोडणार असल्याची माहिती देखील यावेळी दिली.

माहूरगड रेणूका मातेचे दर्शन होणार सुलभ

तीर्थक्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष असून, माहुरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी स्वयंचलित पायऱ्या आणि स्कायवॉक करण्याचा प्रकल्प मंजुर केला आहे. त्यासाठी सात कोटी रुपये मंजुर करुन घेतले आहेत. मार्च महिन्यात मी भुमिपुजन करण्यासाठी माहुरला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.

Tags

follow us