छत्रपती संभाजीनगरचं निर्मनुष्य घर अन् रात्री पोलिसांची धाड; TCS प्रकरणातील फरार निदा खानला कसं पकडलं?
Nashik TCS case Nida Khan संबंधित लैंगिक अत्याचार आणि कथित बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात आता मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे.
Nashik TCS case police raid at night in Chhatrapati Sambhajinagar How was Nida Khan : नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीशी संबंधित लैंगिक अत्याचार आणि कथित बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात आता मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर तिचा शोध सुरू होता. अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आलं असून, या कारवाईमुळे संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती. नाशिक पोलिसांच्या दोन विशेष पथकांकडून तिचा सातत्याने शोध घेतला जात होता.
मंत्री सामंतांचा मोठा निर्णय! अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त
दरम्यान, ती सतत ठिकाण बदलत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. पोलिसांच्या रडारवर असलेल्या निदा खानने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत अखेर तिचा ठावठिकाणा शोधून काढला. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये निदा खान लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला.
ZEE5 च्या वतीने 15 मे 2026 रोजी तिघी’च्या वर्ल्ड डिजिटल प्रीमियरची घोषणा !
त्या वेळी निदा खान आपल्या आई-वडील, भाऊ आणि मावशीसह त्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशीसाठी नाशिकला रवाना केलं. अटकेनंतर रात्री उशिरा तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र निदा खानला पोलिसांनी कसं शोधलं? ही कारवाई अत्यंत थराराक पद्धतीने केली गेली.
निदाला पोलिसांनी कसं पकडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीत निदाच्या नातेवाईकांचा फ्लॅट आहे. तिथे निदा पोलिसांना गुरूवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ताब्यात मिळाली. यावेळी पोलिसांनी निदा तिथे असल्याची टीप मिळाल्यानंतर ते सिव्हिल ड्रेसमध्ये गेले होते. स्थानिक पोलिसांना देखील सतर्क राहण्यास सांगितलं होतं. दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आलं होतं. तसेच पोलिसांनी गाडी देखील पोलिसांची वापरली नव्हती. गेल्या 3-4 दिवसांपासून निदा तिच्या कुटुंबासोबत इथे राहत होती.
दरम्यान सत्र न्यायालयाने अटक पुर्व जामीन फेटाळल्यानंतर ती आता उच्च न्यायालयामध्ये अटक पुर्व जामीनासाठी अर्ज करणार होती. त्यासाठी ती स्थानिक वकिलांशी संपर्कात होती. मात्र त्या अगोदरच पोलिसांनी तीला ताब्यात घेतलं आहे. तसेच ती महिला आरोपी असल्याने तिला तात्काळ संभाजीनगरच्याच न्यायाधिशांच्या घरी नेत्यात आलं. तिची कस्टडी पोलिसांनी मिळवली. अशा प्रकारे निदाला पडकण्याचा एक थरारक घटनाक्रम झाल्यानंतर आता तिला नाशिकला रवाना करण्यात आलं आहे.