पुण्यात शिक्षण, नाशिकमध्ये नोकरी अन् दिल्ली बॉम्बस्फोट कनेक्शन? निदा खानच्या गूढ प्रवासाची A टू Z स्टोरी…
Nashik TCS conversion case मध्ये एचआर मॅनेजर निदा खान हीचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ही निदा खान कोण आहे? जाणून घ्या...
Nashik TCS conversion case who is Nida Khan Pune University connection and new threads in front : नाशिकमध्ये इंटरनॅशनल आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणासह कथित धर्मांतरणाच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून तपासाचा व्याप आता अधिक वाढला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असताना, आता तपासात कंपनीतील एचआर मॅनेजर निदा खान हीचा देखील या प्रकरणामध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ही निदा खान कोण आहे? तिचं शिक्षण कुठे झालं आहे? जाणून घ्या सविस्तर…
निदा खान नेमकी कोण आहे?
नाशिक टीसीएसमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये कंपनीतील एचआर मॅनेजर निदा खान हीचा देखील या प्रकरणामध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. निदा खानचं पुर्ण नाव हे निदा एजाज खान असून तिचं वय 26 वर्ष आहे. तिने पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पदवीचं शिक्षण घेतलं आहे. तिने एमई बी टेकचे शिक्षण पुर्ण केले आहे.तर नाशिक तिचं माहेर आहे. तिने पुणे आणि मुंबईमध्ये आयटी कंपनीमध्ये डेव्हलपर म्हणून काम केल्याची देखील माहिती आहे. त्यानंतर 2021 पासून ती टीसीएसमध्ये पायथन डेव्हलपर्स म्हणून काम करत होती.
आनंदाची बातमी; वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या टळणार, एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचं धान्य मिळणार
दरम्यान ती सध्या फरार असून तिने अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच तीने आपण गरोदर असल्याचा देखील दावा केला आहे. दुसरीकडे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, निदा खान हिचा कथित संबंध दिल्लीतील स्फोट प्रकरणातील संशयित आरोपी डॉक्टर शाहीन यांच्याशी असल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik TCS Case : नाशिक धर्मांतरण प्रकरणात ट्विस्ट; निदा खान ‘HR’ नव्हतीच? वकिलांचा दावा
या संभाव्य कनेक्शनमुळे तपासाचा दृष्टिकोन केवळ स्थानिक गुन्ह्यांपुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 8 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तपासाची संवेदनशीलता लक्षात घेता हा संपूर्ण तपास आता अँटी टेरारिज्म स्कॉड अर्थातच एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसचे पथक स्वतः या प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी करणार असून, नाशिक शहर पोलिसांकडून तक्रारदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मोदी सरकारने महिला आरक्षणाबाबची अधिसूचना मध्यरात्री का काढली? समजून घ्या सोप्या भाषेत
काही दिवसांपूर्वी या प्रकरणाशी संबंधित काही फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. सकल हिंदू समाजातर्फे TCS कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संबंधित प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या प्रकरणाशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावी. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.