नवी मुंबई विमानतळ उद्घाटन, PM मोदी अन् दि.बा.पाटील यांचा विशेष उल्लेख

PM Modi  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (8 ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे.

PM Modi 

PM Modi  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (8 ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनेते दि.बा.पाटील यांचा देखील उल्लेख केला. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील (D.B. Patil) यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी अप्रत्यक्षपणे मंजुरी दिली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

या कार्यक्रमात मराठीमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज या महत्वाच्या क्षणी मी महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचेही स्मरण करतो. त्यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या सेवाभावाने काम केले ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांचे जीवन सामाजिक जीवनात काम करणाऱ्यांना नेहमीच प्रेरणा देते राहिले आहे असं या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे विमानतळ या क्षेत्रात आशियातील सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटी हबच्या रुपात स्थापित करण्यात मोठी भूमिका निभावेल. आज मुंबईला पुर्णपणे अंडरग्राऊंड मेट्रोही मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत प्रवास अधिक सुलभ होईल.

PM मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, व्यापार आणि पर्यटनाला मिळणार चालना 

लोकांचा वेळ वाचेल. ही अंडरग्राउंड मेट्रो विकसित होणाऱ्या भारताचे जिवंत प्रतीक आहे असं देखील या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

follow us