बंडाचं कारस्थान पवारांचचं! 40 वर्षांपासून साथ दिलेल्या शिलेदारने फोडली सर्व गुपितं

बंडाचं कारस्थान पवारांचचं! 40 वर्षांपासून साथ दिलेल्या शिलेदारने फोडली सर्व गुपितं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील बंड आणि सरकारमधील सहभाग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. (NCP Leader Ajit Pawar went with BJP Its planned by NCP Chief Sharad Pawar)

मात्र अजितदादांचं हे बंड म्हणजे फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक नसून शरद पवार यांचीच खेळी असल्याचा खळबळजनक दावा पवारांसोबत 40 वर्षांपासून काम करणाऱ्या शिलेदाराने केला आहे. शरद पवार यांचे सहकारी चंद्रराव तावरे यांनी ABP माझासोबत बोलताना हा दावा केला. ते म्हणाले, हे सगळं नाटक शरद पवार यांनीच घडवलं आहे. मी 40 वर्षांपासून पवारांबरोबर राजकारणात होतो. मी निवडणुकीत त्यांचा प्रचारही केला आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे हे मला माहित आहे.

अजितदादांना सोबत घेण्याचा आदेश दिल्लीतून; त्यांना स्विकारावं लागेल! फडणवीसांचं आवाहन

याशिवाय शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीही फूट पडू शकत नाही. हे सगळे लोक एकत्रच आहेत. हे सगळं दाखवण्यासाठी वरच्या लोकांना सांगण्यासाठी हे सगळं चाललं आहे. यातून त्यांच्यावर ज्या काही कारवाया होणार आहेत त्या टाळण्यासाठी शरद पवार यांनी हे पाऊल उचललेलं असावं. शरद पवार आत्ता जे करत आहेत त्याच्याही पुढे जाऊ शकतात. कारण कायद्याचा बडगा उगारला गेला तर कुटुंबाची वाताहात होणार आहे. अडचण टाळण्यासाठी शरद पवारांनी हे सगळं घडवलं आहे, असा दावाही तावरे यांनी केला.

हो, भाजपसोबत तीन वेळा चर्चा झाली होती! बंडानंतर पवारांचा पहिल्यांदाच अजितदादांना पाठिंबा

अजितदादांच्या युतीवर फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस यांनी शुक्रवारी (7 जुलै) मुंबईमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार, नेत्यांची बैठक घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात अजित पवार यांच्या सोबतच्या युतीचे स्पष्टीकरण देत त्यांनी नेत्यांना एक आवाहन केलं.  ते म्हणाले, महाविकास आघाडी तुटणे आपल्यासाठी अत्यावश्यक होते. तिन्ही पक्षांची ताकद आपल्यासाठी अडचणीची ठरणारी होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले. या पार्श्वभूमीवरच पवारांशी युतीचा निर्णय सर्वोच्च नेतृत्वाने घेतला होता. त्यामुळे त्यांना स्वीकारावे लागेल आणि त्यांचे स्वागत करावे लागेल. त्यांच्यासोबतच आपल्याला पुढील निवडणुका लढवायच्या आहेत, असं सांगत तडजोडीचं राजकारण स्विकारण्याचं आवाहन केल्याची माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube