सुप्रियाताई, जयंतराव की अजितदादा; राष्ट्रवादीचे नवे कार्याध्यक्ष पटेलांच्या मनातील भावी CM कोण?

सुप्रियाताई, जयंतराव की अजितदादा; राष्ट्रवादीचे नवे कार्याध्यक्ष पटेलांच्या मनातील भावी CM कोण?

Prafull Patel On NCP CM :  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या आगामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार याविषयी चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे यावर प्रफुल्ल पटेल यांनी थेट उत्तर दिले. यावेळी ते मुंबई तक या वृत्त वाहिनीवर बोलत होते.

Loksabha: 2024साठी रणजितसिंह निंबाळकरांनी ठोकला शड्डू; रामराजेंना दिले चॅलेंज

अजित पवार हे आमच्या पक्षाकडून उपमुख्यमंत्री होते. सध्या विरोधी पक्षनेते आहे. उद्या जर महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाचा प्रसंग आला तर अजितदाद का नाही, असे पटेलांनी सांगितले. आमच्या आमदारांच्यामध्ये जो लोकप्रिय असले त्याला आम्ही का करु नये. अजित पवार विरोधी पक्षनेते आहे म्हणजे विधीमंडळाचे नेते आहेत. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे पहिले दावेदार असतील असा प्रश्न त्यांना विचारला असता का नाही म्हणत त्यांनी थेट उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीसाठी संजय राऊतांची काय किंमत? प्रफुल्ल पटेलांना स्पष्टच सांगितलं

याआधी छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह पाटील हे तीन नेते उपमुख्यमंत्री होते. जर आम्हाला मुख्यमंत्री ठरवायची वेळ आली असती तर आम्ही यांना दिलं असतं, असेही पटेल म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की,  “जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. वरिष्ठ नेते आहे. त्यांना अनुभव आहे. एकाचवेळी ते राजकारणात आले. 15 वर्ष मंत्री होते. त्यामुळे ते देखील मुख्यमंत्री  असू शकतात. तसेच आमच्या पक्षाला जो बळकट करु शकतो. ज्या नेत्याला आमदारांची पसंती असेल त्याला आम्ही मुख्यमंत्री  करु, असे पटेल म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube