राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय… माजी आमदाराने साथ सोडताच तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त वक्तव्य
Tanaji Sawant यांनी आता माजी आमदाराने देखील राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्याने संतापून राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं
NCP’s without power… Tanaji Sawant’s controversial statement about NCP as ex-MLA leaves support : सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच पक्षांमध्ये इन्कमिंग सुरू आहे. यामध्येच एकीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत त्यांची त्यांच्या भावानेच साथ सोडल्यानंतर आता माजी आमदाराने देखील राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्याने संतापलेल्या तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?
धाराशिवमध्ये बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, ही राष्ट्रवादीची औलाद आहे. ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो. तसं राष्ट्रवादीला होतं. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. हे मी सांगतच होतो. याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल. असं म्हणत सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या मुद्द्यावरून संतापत हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
काशीद बीचवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू; अकोल्यातील विद्यार्थी सहलीला गेले असता घडली दुर्घटना
दुसरीकडे तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी भूम, परंडा नगरपरिषदेमध्ये सर्व पक्ष एकत्र येत आहेत, ज्यामध्ये भाजप शिवसेना ठाकरे गट रणनीती आखत आहे. यासाठी या सर्व पक्षांच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. यावर बोलताना देखील सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ते म्हणाले की, मी कधीही एक लाख चलो रे चा नारा दिलेल्या नाही. मोठ्या पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता मात्र स्वबळावर लढण्याचा घोषणा केल्या. त्यामुळे आम्ही देखील ग्राफील नाही सर्व जागा लढण्याची आमची तयारी आहे.
