गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावर लगाम; बुकिंग प्रक्रिया थेट कंपन्यांकडे, ऑनलाईन बुकिंग अनिवार्य

एजन्सीचे बुकिंगचे अधिकार मर्यादित करण्यात आले असून ग्राहकांना केवळ ऑनलाईन किंवा कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरूनच बुकिंग करावे लागणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 76

New gas booking policy implemented : देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये होणारा विलंब, सतत बदलणारे नियम आणि वाढलेली प्रतीक्षा यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर मिळण्यासाठी ८ ते १० दिवसांची वाट पाहावी लागत असून, बुकिंग केल्यानंतरही वेळेवर डिलिव्हरी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल केला आहेत. आता गॅस एजन्सीचे बुकिंगचे अधिकार मर्यादित करण्यात आले असून ग्राहकांना केवळ ऑनलाईन किंवा कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरूनच बुकिंग करावे लागणार आहे. यापूर्वी अनेकदा डिलिव्हरी बॉयकडून सोयीनुसार बुकिंग करणे किंवा गॅस वितरणात एजन्सी स्तरावर हस्तक्षेप होण्याचे प्रकार घडत होते. हे प्रकार थांबवण्यासाठी आता डायरेक्त्त कंपनी बुकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन पद्धतीने सिलेंडर बुक करणे अनिवार्य झाले आहे.

गेल्या काही दिवसांत गॅस कंपन्यांनी बुकिंगच्या नियमांमध्ये वारंवार बदल केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः दुसऱ्या सिलिंडरच्या बुकिंगसाठी आता ठराविक अंतर ठेवण्यात आले असून, शहरी भागात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांचे अंतर बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मी कृष्ण आणि तू माझी तू राधा म्हणत भोंदूगिरीच्या आड अत्याचार; कॅप्टन अशोक खरातचा घाणेरडा खेळ उघड

दरम्यान, ऑनलाईन बुकिंग प्रणालीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांना बुकिंग करतानाच अडथळे येत आहेत. ओटीपी पडताळणी, सर्व्हरवरील ताण आणि ई-केवायसी प्रक्रियेमुळे बुकिंग प्रक्रिया संथ झाली आहे. परिणामी, अनेक ठिकाणी ग्राहकांना गॅस एजन्सीवर प्रत्यक्ष जाऊन बुकिंग करावी लागत असून, एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

गॅस टंचाईची भीती पसरल्यामुळे अनेक ग्राहक आगाऊ बुकिंग करत असल्याचेही समोर आले आहे. डबल सिलिंडर असलेले ग्राहकही गरज नसताना बुकिंग करत असल्याने मागणीत अचानक वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम खऱ्या गरजू ग्राहकांवर होत असून, त्यांना वेळेवर गॅस मिळण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, सरकारकडून नागरिकांना घाबरून बुकिंग करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशात पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात मात्र वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. एकीकडे नियमांमध्ये बदल, दुसरीकडे तांत्रिक अडचणी आणि वाढलेली मागणी, या तिन्ही गोष्टींचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us