Video : ‘I AmSorry’ इन्स्टावर स्टोरी ठेऊन कुणाल खवल्या डोंगरावर गेला, कुणालविषयी मित्र कुणाल काय म्हणाला?
कुणाल हा माझा मित्र होता. तो नीटची तयारी करत होता मिही नीटची तयारी करतो. माझं किराणा मालाचं दुकाण आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील खवल्या (Crime) डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या घटनेत चांदगुडे कुटुंबातील तीन लोकांचा जागीच अंत झाला. कुणाल (वय १९ वर्षे), त्याचे वडील मुरलीधर (वय ४८ वर्षे) आणि आई संगीता (वय ४२ वर्षे) यांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला कुणालला आयफोन हवा आहे आणि या मागणीमुळं त्याने हे पाऊल उचललं आहे, पण यामध्ये आयफोन कारण नसून दुसरेच कारण समोर आले आहेत. लेट्सअप मराठीने कुणाल चांदगुडे याचा मित्र असेल्या कुणाल सकुंडे याच्याशी संपर्क केला असता त्याने अनेक खुलासे केले आहेत.
कुणाल हा माझा मित्र होता. तो नीटची तयारी करत होता मिही नीटची तयारी करतो. माझं किराणा मालाचं दुकाण आहे. तो अनेकदा आमच्या दुकाणात येत होता. स्वभावाने तो खूप शांत होता. अनेकदा कमी बोलत असला तरी चांगले जोक करत होता. परंतु, तो असा काही तनावात आहे, किंवा असं काही करेल असं कधीही मला वाटलं नाही असं कुणाल यावेळी म्हणाला. त्याचबरोबर त्याने कुणालच्या आयफोनबद्दलही भाष्य केलं आहे.
मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप; जुन्या कौटुंबिक वादाच्या चर्चेला उधाण
कुणालला आयफोन हवा होता म्हणून त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे तर ते किती खर आहे असं विचारलं असता, कुणाल म्हणाला त्याच्याकडं आयफोन अगोदरच होता. तो आयफोनच वापरत होता. त्यामुळं आयफोनसाठी भांडण झाली किंवा आयफोनच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केली असं अजिबात नाही. त्यांचे घरगुती वाद होते. अनेकदा त्यांच्या कुटुंबात वाद होत होते. मुख्यत: त्याच्या वडिलांचे आणि त्याचे वाद होत होते असंही कुणालने सांगितलं आहे.
यावेळी पुढं बोलताना कुणाल म्हणाला, तो ज्या दिवशी आत्महत्या करण्यासाठी गेला त्या दिवशी त्याने इन्स्टाग्रामवर सॉरी सर्वांना अशी स्टोरी ठेवली होती. त्यामुळं तो अशा विचारात असल्याचं लक्षात आलं. तसंच, जेव्हा तो डोंगरावर गेला तेव्हा त्याने त्याच्या आईला फोनही केला होता. त्यामुळं त्याच्या मनात काहीतरी वेगळच होत असंही कुणाल यावेळी म्हणाला आहे. दरम्यान, आयफोन किंवा तो इतर कुठल्या तनावात होता असं नसून घरातील भांडणामुळच हे घडलं असं कुणालने यावेळी स्पष्ट केलं आहे.