निला विखेंवरून लंके म्हणाले कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी… स्वीडन कुठं ते माहित नाही विखेंचा टोला
Nilish lanke and Sujay Vikhe निला विखेंच्या खासदारकीचं श्रेय घेणाऱ्या विखेंवर लंकेंनी टीका केली तर सुजय विखेंनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
Nilish lanke and Sujay Vikhe Cricize each other on Nila Vikhe become MP in Swiden : दिवगंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची नात व शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे यांची मुलगी निला या खासदार झाल्या आहेत. त्यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री झाली आहे. मात्र यानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात त्यावरून कौतुक श्रेय अन् टीकेचं राजकारण तापलं आहे. यामध्ये अगोदर मंत्री आणि माजी खासदार असलेल्या विखे-पितापुत्रांकडून निला विखेंचं कौतुक करण्यात आलं. तसेच यातून सुजय विखेंनी आपल्या खासदारकीतील पराभवाचे शल्य पुन्हा बोलून दाखवले. त्यानंतर आता लंकेंनी विखेंवर टीका केली तर या टीकेला सुजय विखेंनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले निलेश लंके?
अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबातील कन्या निला विखे यांचं स्वीडनमध्ये खासदार झाल्या म्हणून अभिनंदन करणारी एक पोस्ट फेसबुक अकाऊंटवर शेअर केली. यातून त्यांनी अगोदर निला विखेंच्या खासदारकीचं श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरून विखेंवर टीका केली. ते म्हणाले की, आपले कर्तुत्व एवढे मोठे करा की, कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी आज तुमचे नाव घेऊन स्वतःचा मोठेपणा सांगितला पाहिजे! अभिनंदन अहिल्यानगरची सुपुत्री ‘’स्वीडन खासदार’’ निला अशोक विखे पाटील.
लंकेंच्या टीकेला सुजय विखेंचं प्रत्युत्तर म्हणाले…
दुसरीकडे लंकेच्या या टीकेला सुजय विखेंनी माध्यमांशी बोलताना प्रत्त्युत्तर दिले आहे. जिल्ह्यासाठी काही करू शकले नाही कौटुंबिक वादात राजकारण करणं जिल्ह्यासाठी धोकादायक ; डॉ सुजय विखे पाटील खासदारांचे काही ठरलेले डायलॉग आहेत. त्यांना स्वीडन कुठे आहे, हेही माहिती नाही, त्यामुळे त्यांनी या विषयावर भाष्य करू नये.
निवडणूक आयोगात कोणतेही ‘मतभेद’ नाहीत; SIR’बाबत तिन्ही आयुक्त एकत्र, आयोगाने केला मोठा खुलासा
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मागील दोन वर्षांत या जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही. जिल्ह्यासाठी ठोस काम करता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादात किंवा कौटुंबिक संवादात पडून त्याचं राजकारण करणं, ही विचारसरणीच या जिल्ह्यासाठी धोकादायक आहे.
राजकीय व्यक्तीचं राजकीय आणि व्यक्तिगत असं दोन वेगळं आयुष्य असतं. राजकीय आयुष्यात पक्ष असतात, पक्षाच्या भूमिका असतात आणि आरोप-प्रत्यारोपही होतात. मात्र, व्यक्तिगत आयुष्याची एक मर्यादा असते.गेल्या काही वर्षांत खासदारांवर अनेक आरोप झाले. महिलांशी संबंधित आरोप झाले, कॉल रेकॉर्डिंगही समोर आली. मात्र, मी कधीही त्या मुद्द्यांचा राजकीय फायदा घेऊन भाष्य केलेलं नाही. माझी एकही बाईट दाखवा, ज्यामध्ये मी खासदारांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा चारित्र्यावर भाष्य केलं आहे.
‘तुझ्या आयला’ : मुलं… शिव्या… अन् बरंच काही…
कारण व्यक्तिगत आयुष्यात कोणाच्याही जाणं योग्य नाही, हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जपला आहे आणि तोच सुसंस्कृतपणा जपण्याचा मी प्रयत्न करतोय.मात्र, ज्यांना समाजाच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, ते दुसऱ्यांच्या कौटुंबिक विषयांना राजकीय मुद्दा बनवत असतील, तर त्यावर जनतेने नक्कीच विचार केला पाहिजे.