Nitin Desai Death Case : RBI चे सर्व नियम पाळले; गुन्हा दाखल होताच एडलवाईस कंपनीचे स्पष्टीकरण

  • Written By: Published:
Nitin Desai Death Case : RBI चे सर्व नियम पाळले; गुन्हा दाखल होताच एडलवाईस कंपनीचे स्पष्टीकरण

Nitin Desai Death Case : कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर काल (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्या आत्महत्येनंतर पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. नेहा देसाईंच्या तक्रारीवरुन इसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी, असे एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता एडलवाईस कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच एडलवाइज आर्कने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनिवार्य केलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केल्याचेही पत्रका म्हटले आहे.

मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक

पत्रकात नेमकं काय?

एडलवाईस कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नितीन देसाई यांच्या निधनामुळे एडलवाईस एआरसीला दु:ख झाले आहे. देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी 2016 आणि 2018 मध्ये आर्थिक मदत देण्यात आली होती. मात्र, 2020 पासून कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले पण देसाईंना यश आले नाही. त्यानंतर अखेर देसाईंच्या कंपनीला 2022 मध्ये NCLT कडे (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) पाठवण्यात आले आणि जुलै 2023 मध्ये NCLT ने देसाईंच्या कंपनीविरोधात दिवाळखोरीची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Happy Birthday Kajol : दिलखुलास हसण्याने काजोलला बसला होता बिग बींचा ओरडा

संबंधित कारवाई करताना एडलवाइज आर्कने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनिवार्य केलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केल्याचेही कंपनीने स्पष्टीकरणात स्पष्ट केले आहे. कायदेशीर चौकटीच्या बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. आगामी काळात चौकशी प्रक्रियेला आम्ही पूर्ण सहकार्य करु असेही कंपनीने म्हटले आहे.

‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी (दि. 2 ऑगस्ट) रोजी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला अशी प्राथमिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर देसाई यांच्या पार्थिवावर काल (दि. 4) एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube