Ahilyanagar DCC bank election: विखेंविरोधात कुरघोडी की राम शिंदे यांची राजकीय अस्तित्वाची धडपड…

Ahilyanagar DCC bank election: राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या राजकीय नेत्यांची ताकद आहे, त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

  • Written By: Published:
Ram Shinde

Ahilyanagar DCC bank election: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या काही दिवसात पार पडणार आहे. यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्याकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. सहकार क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी शिंदे यांनी जिल्ह्यातील आजी-माजी नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र सहकार क्षेत्रात वर्षानुवर्षे आपला धबधबा कायम ठेवणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यापुढे शिंदे गेम चेंजर ठरणार का विखेच किंगमेकर ठरणार ही चर्चा देखील या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


भेटीगाठीतून राजकीय जुळवाजुळव

गेल्या काही दिवसांमध्ये राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या राजकीय नेत्यांची ताकद आहे, त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी सुत जुळवण्याचे काम शिंदेंकडून सुरू आहे. यामध्ये त्यांनी नेवासामध्ये यशवंतराव गडाख, संगमनेरमध्ये बाजीराव खेमनार यांचे देखील भेट घेतलीय. विशेष म्हणजे खेमनर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्ती समजले जात. तसेच राहुरीमध्ये प्राजक्ता तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह तनपुरे कारखान्याचे संचालक अरुण तनपुरे यांचे देखील त्यांनी भेट घेतली तसेच सत्यजित कदम यांची भेट घेतली. पांडुरंग अभंग यांची देखील भेट घेतलीय. नुकतेच शासकीय विश्रामगृह येथे भानुदास मुरकुटे यांची देखील भेट घेतली. तर शेवगाव पाथर्डीमध्ये जात आप्पासाहेब राजळे यांची देखील शिंदे यांनी भेट घेतली. विशेष म्हणजे या सर्व भेटीगाठीचे फोटो हे सोशल मीडियावरती पोस्ट देखील करण्यात आले आहे. खरं तर निवडणूक ही पूर्वीच दबावतंत्राचा वापर शिंदेंकडून सुरू आहे. मात्र यावरती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावध भूमिका घेतली आहे.

मी आयुष्यात अपयशी ठरलोय का?, महिना अखेरीस वडिलांकडून पैसे घेणाऱ्या तरुणाची पोस्ट व्हायरल


विखेंची सावध भूमिका भेटीगाठीवरून शिंदेंना टोला

जिल्ह्यात राम शिंदे विरुद्ध विखे हा संघर्ष सर्वश्रुत आहे मात्र राज्यात सह केंद्रात राजकीय वजन असलेले विखे हे राजकारणात देखील डावपेच टाकण्यात तेवढेच माहीर आहे. जिल्हा बँके निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेंकडून सुरू असलेल्या भेटीगाठीवरती मंत्री विखे यांनी सावध भूमिका घेत सूचक वक्तव्य देखील केले आहे. कोण कोणाला भेटत आहे याने फारसा फरक पडत नाही सहकार क्षेत्रातील निवडणुका या संघर्ष टाळून बिनविरोध देखील होऊ शकतात असं सूचक वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. यामुळे वेट अँड वॉच च्या भूमिकेत असलेले विखे ऐनवेळी काय डाव टाकणार व यावरून बँक निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.


राम शिंदे विखेंना शह देतील का ?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही येत्या काही दिवसात होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल तयार करून एक प्रकारे विखेंना शह देण्यासाठी राम शिंदे यांच्याकडून प्रयत्न जरी सुरू आहे. तरी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा नगर जिल्ह्यात वाढता प्रभाव यामुळे शिंदे विचलित असल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच 2019 नंतर विखेंची वाढती ताकद जिल्ह्यात महायुतीची सत्ता आणण्यामध्ये देखील विखेंचा महत्त्वाचा हातभार असल्याने विखेंकडे जिल्ह्याचे केंद्रबिंदू मानले जाते. यामुळे पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी राम शिंदेंकडून जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घातलं जात असल्याचा देखील बोललं जात आहे.

follow us