अहमदनगरच्या कायदा-सुव्यवस्थेचे गाऱ्हाणे थेट गृहमंत्री फडणवीसांच्या दारी

अहमदनगरच्या कायदा-सुव्यवस्थेचे गाऱ्हाणे थेट गृहमंत्री फडणवीसांच्या दारी

 Ahmadnagar : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच चोऱ्या, दरोडे, खून आदी घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा देखील मलीन होत आहे. तसेच शहरात सातत्याने अनेक छोटे मोठे गुन्हे व विचित्र घटना होत आहेत. अनेकदा जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर शहरात कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. नगर शहरात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, अशा मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व जिल्हा उपाध्यक्ष सचिन पारखी यांनी भिवंडी येथे दिली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नगर शहरात सातत्याने अप्रिय व वाईट घटना होत आहेत. काही समाजकंटक जाणूनबुजून या घटना घडवत आहेत. त्यामुळे शहरातील शांततेस बाधा निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन समाजकंटकांवर कारवाई न करता अनेकदा बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे नगर शहरात अशांतता निमांण होत आहे.

कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

अशा परिस्थितीत बिघडत असलेली नगर शहराची कायदा सुव्यवस्था सुरळीत होण्यासाठी उपमुख्यमंत्री या नात्याने आपण वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी गंधे व पारखी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर शहरात स्वतः लक्ष घालुन संबंधीत यंत्रणांना योग्य ते आदेश देतो, असे आश्‍वासन दिले आहे.

अजितदादांची प्रत्येक फाईल माझ्याकडे येणार! नाराज आमदारांना फडणवीसांचा ‘शब्द’

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्हा हा दहशतीखाली वावरत आहे. पोलिसांचा धाक हा गुन्हेगारांना उरलेला नसल्याने नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. दिवसाढवळ्या चोरी, खून, दरोडे आदी घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. मात्र या गोष्टी रोखण्यामध्ये पोलीस प्रशासन कमी पडत असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. कायद्याचा धाक तसाच वचक हा गुन्हेगारांमध्ये राहिलेला नाही आहे. यामुळे जिल्हा हा दिवसेंदिवस दहशतीखाली जाऊ लागला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube