मेहुण्यानेच मतिमंद मुलीवर अत्याचार करुन गरोदर केलं; न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली…
Ahmednagar Rape Case : मेहुण्यानेच अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार (Rape Case) करुन गरोदर ठेवल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा अहमदनगर जिल्हा न्यायालयाने ठोठावलीयं. पारनेर तालुक्यातील 2018 साली ही घटना घडली. या घटनेनंतर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, सरकारी वकील मनिषा केळकेंद्रे-शिंदे यांनी पीडितेची बाजू मांडली असून आरोपी सागर राजू पंचरास याला दहा वर्षांच्या शिक्षेसह 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलायं.
पैलवान दीनानाथ सिंह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांनी घेतली खांद्यावर गदा
पीडित अल्पवयीन मतिमंद मुलगी पारनेर तालुक्यातील रहिवासी असून दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनूसार मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेत आरोपी मेहुणा सागर राजू पंचरास रा. जवळा. याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवून गरोदर केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचा तपास पीएसआय. बोत्रे, पीएसआय. राजेंद्र पवार, महिला पीएसआय. कविता भुजबळ यांनी केला असून मुलीच्या प्रसुतीनंतर नवजात बालकाचा डिएनए आरोपीशी जुळल्याने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
मोठी बातमी : विधानसभेच्या तोंडावर पवारांना मोठा धक्का; अजितदादांच्या हातीच राहणार ‘घड्याळ’
सुनावणीदरम्यान आरोपी हा पीडीत मुलीचा नात्याने मेहुणा असून अल्पवयीन मुलीवर घरातील नात्यातील जवळच्या व्यक्तीने अत्याचार करण्याच्या घटना समाजामध्ये वाढत चाललेल्या आहेत. पीडीत मुलगी मतिमंद असल्याचा गैरफायदा आरोपी घेत होता. त्यामुळे केवळ 15 वर्षांची असलेल्या पीडीत मतिमंद अल्पवयीन मुलगी ही आरोपीपासून गर्भवती राहिली आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकीलांकडून करण्यात आला.
धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी; कोल्हापूर उत्तरमध्ये क्षीरसागर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत
दरम्यान, सरकारी वकीलांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा न्यायालयाकडून आरोपीला दहा वर्षांची शिक्षा तसेच 5 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीयं. या सुनावणीदरम्यान, विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले असून पोलिस कर्मचारी अडसूळ, शिवनाथ बडे यांनी सहकार्य केलं.